18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

डी जीवनसत्त्वाने अस्थमा नियंत्रणात यश

 डी जीवनसत्त्वामुळे विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे अस्थम्याला अटकाव होतो.

पीटीआय, लंडन | Updated: October 10, 2017 4:19 AM

अस्थम्याचा तीव्र विकार असलेल्या रुग्णांमध्ये नेहमीच्या औषधांबरोबर डी जीवनसत्त्वाचा पूरक वापर केल्यास जोखीम निम्म्याने कमी होते, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. अस्थम्याची लक्षणे तीव्र झाल्यामुळे अनेकदा मृत्यू ओढवतात. श्वसनमार्गातील वरच्या भागात विषाणूंचा संसर्ग असेल तर अस्थमा तीव्र होतो.

डी जीवनसत्त्वामुळे विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे अस्थम्याला अटकाव होतो. लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातील संशोधकांनी ९५५ रुग्णांची यादृच्छिक चाचणी करून त्यांच्यावर या जीवनसत्त्वाचा प्रयोग केला. दि लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले असून डी जीवनसत्त्वाच्या पूरक वापराने याचे प्रमाण ३० टक्के कमी दिसून आले. अस्थम्यात उपचाराकरता स्टेरॉइड्सचा वापर केला जातो.

त्याबरोबर हे जीवनसत्त्व वापरल्यास चांगला परिणाम दिसून येतो. अशा प्रकारच्या ६ टक्के रुग्णांत अस्थम्याचे झटके इतके तीव्र असतात की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते.

जीवनसत्त्व पूरक म्हणून घेतल्यास रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता पन्नास टक्क्यांनी कमी होते. या विद्यापीठाचे प्रमुख संशोधक अ‍ॅड्रियन मार्टेन्यू यांनी सांगितले की, जीवनसत्त्वामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते, परिणामी अस्थम्याला अटकाव होतो. डी जीवनसत्त्व किमतीनेही स्वस्त असल्याने त्याचा वापर करून अस्थमा नियंत्रणात ठेवता येतो.

First Published on October 10, 2017 4:19 am

Web Title: d vitamin can control asthma