News Flash

7.4 लाख मर्सिडीज गाड्यांमध्ये दोष, कंपनीने केल्या ‘रिकॉल’

सी-क्लास, सीएलके-क्लास, सीएलएस क्लास आणि ई-क्लास या प्रकारातील गाड्यांचाही समावेश

जर्मन ऑटोमोबाइल निर्माता कंपनी Daimler AG ने आपल्या मर्सिडीज-बेन्झ प्रकारातील गाड्या परत मागवल्या आहेत. Daimler AG  मर्सिडीज-बेन्झची पॅरंट कंपनी आहे. कंपनीने सुमारे 7 लाख 44 हजार गाड्या परत (रिकॉल)मागवल्या आहेत. ग्लास पॅनल आणि स्लायडिंग रूम फ्रेममध्ये तांत्रिक दोष असल्याने गाड्या परत मागवल्याचे, कारण कंपनीने दिले आहे.

ग्लास पॅनल आणि स्लायडिंग रूम फ्रेममधील तांत्रिक दोषामुळे गाडीला देण्यात आलेले सनरुफ डिटॅच होऊ शकते. असे झाल्यास प्रवास करणाऱ्या व्यक्तींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याची गंभीर दखल घेत कंपनीने या गाड्या परत मागवल्या आहेत. 2001 ते 2011 या कालावधीत तयार झालेल्या गाड्या कंपनीने ग्राहकांकडून परत मागवल्या असून यामध्ये काही सी-क्लास, सीएलके-क्लास, सीएलएस क्लास आणि ई-क्लास या प्रकारातील गाड्यांचाही समावेश आहे. कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी आणल्यानंतर शहानिशा करुन गरज भासल्यास दोष दूर करण्यात येईल, असे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. 14 फेब्रुवारीपासून गाड्या परत मागवण्यास सुरूवात होईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 10:24 am

Web Title: daimler recalls recalls mercedes benz 745000 cars for faulty sunroofs sas 89
Next Stories
1 करा MRI आणि पाहा कोणाच्या डोक्यात किती बुद्धी
2 संधिवातावर नवीन औषध गुणकारी
3 पर्यटनासाठी मलेशियाला जायचंय? मग तुमच्यासाठी आहे ‘ही’ मोफत व्हिसाची ऑफर
Just Now!
X