तणाव, कमी झोप यांमुळे डोळ्याच्याखाली काळी वर्तुळे तयार होतात. सतत डोळे चोळणं, अॅलर्जी, झोप न येणं, डोळ्यांखालची निस्तेज त्वचा, वयोमान, डीहायड्रेशन, आनुवंशिकता आणि कधी कधी पिगमेण्टेशनमुळेही डोळ्यांखाली काळी वर्तृळं निर्माण होतात. ते घालवण्यासाठी डॉक्टर आणि त्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या क्रिमचा वापर केला जातो. पण, जर काही घरगुती उपाय केले तर ही वर्तुळे काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. ही वर्तुळं घालविण्यासाठी मग बाजारात मिळणारी विविध उत्पादने वापरली जातात. त्यातील घटकांची योग्य ती माहिती नसल्याने ही उत्पादने अनेकदा त्वचेसाठी घातक ठरु शकतात.

केवळ सौंदर्यासाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही या काळ्या वर्तुळांचा विचार व्हायला हवा. हे एखाद्या आजाराचे सूचक लक्षण असू शकते. त्यामुळे ही वर्तुळे कशाने तयार झाली यांच्या मूळाशी जाऊन योग्य ते उपचार करायला हवेत. अशाप्रकारच्या सर्व समस्यांसाठी चांगला आहार, पुरेसा व्यायाम, मानसिक शांती आणि योग्य तेवढा वेळ झोप गरजेची असते. तरीही डोळ्याखाली वर्तुळं येत असतील तर काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे –

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

टोमॅटो

एक लहान चमचा लिंबू रस आणि लहान टोमॅटोची पेस्ट एकत्र करुन ते मिश्रण डोळ्याखाली लावावे. हे मिश्रण १० मिनीटे डोळ्यांवर ठेऊन त्यानंतर पाण्याने धुवावे. दिवसातून साधारण दोनवेळा हा प्रयोग केल्यास त्याचा फायदा होतो. याबरोबरच टोमॅटो, लिंबाचा रस आणि पुदीना यांचा रस प्यायल्यासही काळी वर्तुळे कमी होण्यास फायदा होतो.

बटाटा

डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळे लवकरात लवकर घालवायची असतील तर बटाट्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कच्च्या बटाट्याचा रस कापसाच्या बोळ्याने डोळ्यांवर लावावा. यातही कापूस या रसात भिजवून तो डोळ्यांवर ठेवावा. १० मिनिटांसाठी हा कापूस असाच डोळ्यांवर ठेवा आणि नंतर डोळे धुवून टाका.

टी बॅग

थंड टी बॅग या डोळ्यांखालची काळी वर्तुळे जाण्यासाठीचा आणखी एक उत्तम पर्याय असतो. या टी बॅग पाण्यात भिजवून त्या थोडा वेळ फ्रिजमध्ये गार करण्यासाठी ठेवाव्यात. त्यानंतर त्या डोळ्यांवर ठेवाव्यात. या उपायाने तुम्हाला चेहऱ्यात बराच फरक झालेला दिसेल.

बदाम तेल

बदाम तेल केसांच्या, त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम काम करते. यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. त्वचा कोमल होण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे झोपताना डोळ्याखाली बदाम तेल लावून मालिश केल्यास काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होते.

संत्र्याचा रस

संत्र्याचा रस हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे दूर होण्यासाठी आणखी एक उत्तम घरगुती उपाय आहे. हा रस डोळ्यांखाली लावल्यास अगदी कमी वेळात अतिशय चांगला उपयोग झालेला दिसतो. केवळ काळी वर्तुळे कमी करण्यासाठीच नाही तर डोळ्यांची चमक वाढविण्यासाठीही याचा उपयोग होतो.

गुलाब पाणी

गुलाब पाण्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. त्वचेत जीवंतपणा येण्यासाठी या पाण्याचा उपयोग होतो. दिवसातून दोन वेळा १५ मिनीटांसाठी कापसावर गुलाबपाणी टाकून हा कापूस डोळ्यांवर ठेवल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.