सोशल मीडियाचा वापर सध्या सर्वच वयोगटात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामध्येही व्हॉटस अॅपचा विविध कारणांनी वाढलेला वापर जास्त असल्याचे दिसते. स्क्रीनवर सतत डोळे असल्याने डोळ्यांना त्रास होण्याचीही शक्यता असते. पण आपल्या ग्राहकांचा त्रास वाचावा यासाठी व्हॉटस अॅपने पुढाकार घेतला आहे. कंपनीने ग्राहकांच्या डोळ्याला स्क्रीनचा त्रास होऊ नये यासाठी ‘डार्क मोड’ असा पर्याय दिला आहे. या फिचरमुळे मोबाईलचा लाईट कमी होऊन डोळ्यावर स्क्रीनमुळे येणारा ताण कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा लाईट आपल्या सोयीनुसार कमी-जास्त करता येऊ शकतो. यासाठी युजरला आपले व्हॉटस अॅप अपडेट करावे लागणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या वर्षाच्या शेवटी हे फिचर प्रत्यक्ष वापरात येईल असेही कंपनीने सांगितले आहे. याआधी युट्यूब, ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया साईटनेही आपल्या ग्राहकांसाठी अशाच प्रकारचे फिचर आणले होते. व्हॉटसअॅपही ग्राहकांना अॅप्लिकेशन वापरणे अधिकाधिक सोयीचे व्हावे यादृष्टीने आपले अॅप अपडेट करत असते. ग्राहकांची जास्तीत जास्त सोय व्हावी यासाठी अपडेट केले जाणारे हे अॅप त्यामुळेच लोकप्रिय अॅप्लिकेशन आहे. सध्या कंपनी आपल्या या फिचरवर काम करत असून सर्व चाचण्या केल्यानंतर हे फिचर ग्राहकांना वापरण्यास उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे आता तुम्ही जास्त वेळ व्हॉटस अॅपवर असाल तरीही तुमच्या डोळ्यांना विशेष त्रास होणार नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dark mode will available on whatsapp soon beneficial for users eyes
First published on: 24-09-2018 at 19:23 IST