खजुराचे रोल
सामग्री :
१ टीस्पून तूप
२५० ग्रॅम खजूर (खजूर काळे असावे )
५० ग्रॅम किसलेले नारळ (सुका खोबरा)
१०० ग्रॅम मिक्स ड्राय फ्रूट्स
५० ग्रॅम खसखस
बनवण्याची प्रक्रिया
कढईत तूप गरम करावे आणि बारीक चिरलेली खजूर मऊ होईपर्यंत ५ मिनिटे शिजवा.
ते आचेवरून काढा आणि सर्व ड्राय फ्रुट्स आणि खोबऱ्याचे किस मिक्स करा.
रोलचा आकार द्या आणि खसखशीच्या बियामध्ये हा रोल फिरवून घ्या, ज्यामुळे खसखशीची आवरण तयार होईल.
त्यानंतर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुम्ही खजुराचे रोल सहज तयार करू शकता.
(शेफ: निरंजन गद्रे, व्याख्याता, आयटीएम आयएचएम नेरूळ, नवी मुंबई )
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2020 3:46 pm