ज्या लोकांना दिवसा झोपाळल्यासारखे जास्त प्रमाणात वाटते, त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता इतरांच्या तीन पट अधिक असते, असे एका दीर्घकालीन अभ्यासात दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्लीप या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून ज्या प्रौढांमध्ये दिवसाचा झोपाळूपणा अधिक असतो, त्यांच्यात इतरांपेक्षा स्मृतिभ्रंशाचा धोका जास्त असतो याचे कारण म्हणजे त्यांच्या मेंदूत बीटा अमायलॉइड हे प्रथिन साठत जाते व तो अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश होण्याची मोठी खूण मानली जाते. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधकांनी म्हटल्यानुसार अल्झायमर टाळण्यासाठी रात्रीची पुरेशी व चांगली झोप असणे आवश्यक असते.

विस्कळीत झोपेने अल्झायमर होत असल्याने झोपेवर उपचार करणे गरजेचे आहे, असे हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेचे प्राध्यापक अ‍ॅडम स्पिरा यांनी सांगितले. १९५८ पासूनची हजारो लोकांची संकलित माहिती यात वापरण्यात आली. यात १९९१ ते २००० या काळात रुग्णांच्या परीक्षा घेण्यात येऊन प्रश्नावलीही देण्यात आल्या.

२००५ पासून  काही रुग्णांच्या मेंदूतील बिटा अमायलॉइडचे थर तपासण्यासाठी पीटसर्ब संयुग बी या किरणोत्सारी संयुगाचा वापर करण्यात आला.  १२३ जणांमध्ये १६ वर्षांनी पुन्हा तपासणी करण्यात आली असता. ज्यांच्यात दिवसा झोप अधिक होती, त्यांच्यात बिटा अमायलॉइडचे प्रमाण वाढलेले दिसले. वय, लिंग, शिक्षण, बॉडी मास इंडेक्स हे सगळे घटक दिवसाच्या झोपाळूपणावर परिणाम करीत असतात. दिवसा झोपण्याने हे प्रथिन का वाढते हे समजू शकलेले नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Day sleep not good for health
First published on: 08-09-2018 at 00:48 IST