04 March 2021

News Flash

धुम्रपानामुळे होणा-या मृत्यूंमध्ये भारत दुस-या क्रमांकावर

जगातील ११% टक्के मृत्यू धुम्रपानामुळे होतात

‘धुम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे.’, ‘ smoking is injurious to health’ सिगारेटच्या पाकिटावरच काय पण वारंवार करण्यात येणा-या जाहिरातींमधूनही ओरडून ओरडून सांगितलं जातं, पण याकडे कोण लक्ष देतेय? धुम्रपान करणं आरोग्यास कितीही हानिकारक असंल आणि त्यामुळे कितीही गंभीर आजार होत असले तरी धुम्रपान करणा-यांच्या संख्येत काही घट नाही हे दुर्दैवाची बाब. नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार धुम्रपानामुळे ११ टक्के लोक जगभरात मृत्यूमुखी पडले आहे आणि त्यातले ५०% लोक हे चीन, भारत, अमेरिका आणि रशिया देशातले होते. या चार देशांमध्ये धुम्रपानामुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या अधिक आहे. चीनमध्ये धुम्रपान करणा-यांमुळे सर्वाधिक जणांचा मृत्यू झाला आहे यानंतर भारताचा क्रमांक लागतो. अमेरिका आणि रशिया अनुक्रमे तिस-या आणि चौथ्या स्थानावर आहे.

२०१५ मध्ये आरोग्याच्या समस्येमुळे ६४ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यात ११% मृत्यू हे केवळ धुम्रपानामुळे झाले होते. मेडिकल जर्नल ऑफ ल्रन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतात धुम्रपान करणा-यांची संख्या अधिक आहे. जगातील एकूण धुम्रपान करणा-यांपैकी दुर्दैवाने ११ % स्मोकर्स हे भारतात आहे. त्यातूनही पुरूषांची संख्या ही अधिक आहे. धुम्रपानाची समस्याही दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. भारतात धुम्रपानाविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्याचप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थावरही वैधानिक इशारा देणे बंधनकारक आहे. जगातील काही मोजक्या देशांपैकी भारत असा एक देश आहे जिथे तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी नियमावली आहे. तरीदेखील भारतात धुम्रपान करणा-यांची आणि त्यामुळे मृत्यूमुखी पडणा-यांची संख्या अधिक आहे. या यादीत भारताचे स्थान दुस-या क्रमांकावर असणे ही मोठ्या धोक्याची सुचना आहे. बदलती जीवनशैली, ताण तणाव यातून सुटका करण्यासाठी अनेक तरूण धुम्रपानाच्या आहारी जात आहे. जगातील दर चार व्यक्तींपैकी १ व्यक्ती ही नियमित धुम्रपान करते. धुम्रपानामुळे होणा-या मृत्यूच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशातच भारताचे नाव या यादीत दुस-या क्रमांकावर असणे हा गांभीर्याचा विषय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 9:05 am

Web Title: deaths attributable to smoking increased in india
Next Stories
1 हृदयविकाराच्या झटक्याचे अचूक निदान
2 घरचा वैद्य : कार्श्य आणि केसांचे विकार
3 Mobile Review : झेनफोन थ्री एस मॅक्स
Just Now!
X