08 July 2020

News Flash

तातडीने Delete करा धोकादायक 29 अ‍ॅप्स, गुगलने Play Store मधूनही हटवले

युजर्सची खासगी माहिती चोरणारे हे अ‍ॅप्स एक कोटींहून अधिक युजर्सनी डाउनलोड केले आहेत

इंटरनेटच्या सध्याच्या युगात डेटा चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी गुगलकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून नुकतेच 29 लोकप्रिय अ‍ॅप्स प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले आहेत. जवळपास एक कोटींहून अधिक युजर्सनी हे अ‍ॅप्स डाउनलोड केले आहेत. ‘सायबर सिक्युरिटी फर्म क्विक हिल सिक्युरिटी लॅब’कडून या अ‍ॅप्सबाबत तक्रार करण्यात आली होती. 29 पैकी 24 अ‍ॅप्स हे उपकरणांमध्ये जाहिरातींद्वारे HiddAd मॅलवेअर (व्हायरस) सोडत असल्यामुळे हटवण्यात आल्याची माहिती आहे. युजर्सची खासगी माहिती चोरत असल्यामुळे हे अ‍ॅप्स गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले आहेत.

कशाप्रकारे कार्यरत होते हे अ‍ॅप्स –
Quick Heal च्या अहवालानुसार, युजरने हे अ‍ॅप्स डाउनलोड केल्यानंतर ते आपला icon लपवायचे व आपोआप एक शॉर्टकट तयार करायचे. युजरला अ‍ॅप अनइंस्टॉल करता येऊ नये यासाठी icon लपवला जायचा. त्यानंतर, युजरने होमस्क्रीनवरील शॉर्टकटवर टच केल्यास डिव्हाइसमध्ये फुल स्क्रीनमध्ये जाहिराती दिसायच्या. तर अन्य पाच अ‍ॅप्समध्ये जाहिरातींद्वारे Adware चा वापर केला जात होता.

कोणते आहेत Delete केलेले अ‍ॅप्स –
क्विक हीलने जारी केलेल्या यादीनुसार, यामध्ये फील कॅमेरा एचडी (Feel Camera HD), फिल्टर फोटो फ्रेम (Filter Photo Frame), लेंस फ्लेअर्स (Lens Flares), मॅजिक इफेक्ट (Magic Effect), क्यूआर कोड स्कॅनर (QR Code Scanner), सुपर मार्क (Super Mark), फोटो इफेक्ट प्रो(Photo Effect Pro), आर्ट फिल्टर (Art Filter), लाय डिटेक्टर प्रँक (Lie Detector prank), न्यू हेअर फॅशन (New Hair Fashion), स्मार्ट मॅग्निफायर प्रो (Smart Magnifier Pro), मॅग्निफायर प्रो-मॅग्निफायिंग ग्लास (Magnifier Pro- Magnifying glass), मॅग्निफायिंग ग्लास प्रो (Magnifying Glass Pro), कट कट मिक्स (Cut Cut Mix), कट कट मिक्स प्रो (Cut Cut Mix Pro), गॅलेक्सी ओव्हरले (Galaxy Overlay), कलर स्प्लॅश फोटो इफेक्ट (Color Splash Photo Effect), एज फेस (Age Face), फोटो ब्लर (Photo Blur), ब्लर इमेज (Blur Image), सुपर मॅग्निफायर लाइट (Super Magnifier Lite), मॅग्निफायिंग प्रो (Magnifying Pro), क्विंग कॅमेरा (Qing Camera), रिफ्लेक्स कॅमेरा एचडी (Reflex Camera HD), फर्स्ट कॅमेरा एचडी (First Camera HD), रिदम कॅमेरा (Rhythm Camera), प्रिटी मेकरअप फोटो (Pretty Makerup Photo), ग्लिच लेंस-व्हेपरवेव अँड घोस्ट फोटो एडिटर (Glitch Lens – Vaporwave & Ghost Photo Editor), मल्टी अ‍ॅप्स-मल्टिपल अकाउंट्स सायमल्टेनियस्ली(Multi Apps – Multiple Accounts Simultaneously) या अॅप्स समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2019 12:12 pm

Web Title: delete 29 popular apps from your android phone right now sas 89
Next Stories
1 हे काय घडलं : आठ वर्षाच्या मुलाने पकडला ३१४ किलोचा शार्क
2 गाण्यानंतर आता डान्समुळे रानू मंडल चर्चेत; पाहा व्हायरल व्हिडिओ
3 Viral Video : चक्क माकड शोधत पोलिसांच्या डोक्यातील उवा
Just Now!
X