डेनिम हे तरुणाईमध्ये सर्वात आवडते फॅब्रिक आहे. त्यामध्ये उपलब्ध असलेले विविध प्रकार हे तरुणांना आकर्षित करण्याचे मुख्य कारण आहे. मागील वर्षांमध्ये डेनिम फॅशनमध्ये कशाप्रकारे बदल झाले आणि यावर्षी प्रकारचे डेनिम ट्रेंड असतील याविषयी स्पायकर लाइफस्टाईलचे डिझाइनर हेड अभिषेक यादव यांनी माहिती सांगितली आहे. १४० वर्षांमध्ये डेनिम हे जगातील सर्वात लोकप्रिय कापडांपैकी एक आहे. तरुण डिझाइनर्समध्येही याला विशेष पसंती मिळताना दिसते.

वयाची संकल्पना दिवसेंदिवस बदलत चालली आहे; ३० वय हे आताचे २० वय झाले आहे आणि ४० वय नवीन ३० प्रमाणे आहे. फॅशनची जाण असलेल्या ग्राहकांना चांगल्या दर्जाचे कपडे हवे असतात जे त्यांचे व्यक्तीमत्व खुलवण्यास मदत करतात. आवडीच्या ड्रेसिंगची मागणी करणाऱ्या तरुण ग्राहकांना पोशाखाद्वारे स्वत:ला अभिव्यक्त करू इच्छितात, जे त्यांना सगळ्यांमध्ये उठून दिसण्यास मदत करते. सध्या फॅशन ही तरुणांना केंद्रित ठेऊन केली जाते. डेनिमची सखोल डिझाइनची संकल्पना, अत्याधुनिक डेनिम्स क्लासिक लुकला आव्हान देतात. हँडमेड डुडल आर्ट आणि टायपोग्राफी यामध्ये काही तंत्र वापरली जातात. डेनिम पॅच, पिन आणि स्ट्रीप्ससह सुशोभित केले जाते, जे एम्ब्रोएडरी आणि प्रिंट फॉर्ममध्ये केले जातात.