News Flash

नैराश्याने कर्करुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक

   कर्करोगात धूम्रपान सोडणे, झोपेच्या सवयी बदलणे, पोषण वाढवणे हे उपाय करणे आवश्यक असते.  

| January 24, 2018 03:00 am

प्रतिनिधिक छायाचित्र

मान व डोक्याच्या कर्करोगात रुग्ण दगावण्याचे प्रमाण हे अगदी थोडय़ा नैराश्यामुळेही वाढते, असे मत नवीन अभ्यासात व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये नैराश्याचा आजार आहे किंवा नाही याचेही निदान करणे पूरक ठरू शकते.

युनिव्हर्सिटी ऑफ लुईसव्हिले स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेतील संशोधिका एलिझाबेथ कॅश यांनी म्हटले आहे की, नैराश्याची लक्षणे असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक असतो. अशा व्यक्ती कर्करोगावरील उपचारांनाही फार सकारात्मक प्रतिसाद देऊ शकत नाहीत. संशोधकांच्या मते मान व डोक्याच्या कर्करोगात नैराश्यामुळे उपचारांत अनेक अडचणी येतात व उपचारांचे वाईट परिणाम कमी करण्यातही कमी यश येते. १३४ रुग्णांवर करण्यात आलेल्या प्रयोगातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

कर्करोगात धूम्रपान सोडणे, झोपेच्या सवयी बदलणे, पोषण वाढवणे हे उपाय करणे आवश्यक असते.

१३४ रुग्णांचा दोन वर्षांतील वैद्यकीय माहितीचा संच तपासला असता त्यात असे दिसून आले की, केमोथेरपी उपचार घेऊनही त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण जास्त असते. यात रुग्णाचे वय, गाठीचा आकार, धूम्रपानाचा इतिहास या मुद्दय़ांचा विचार करण्यात आला नाही. या रुग्णांमध्ये नैराश्याची अगदी थोडी लक्षणे असतानाच त्याचा वाईट परिणाम कर्करोग उपचारांत झाला, असे कॅन्सर या नियतकालिकातील संशोधन निबंधात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 3:00 am

Web Title: depression is harmful for cancer patients
Next Stories
1 ७३ टक्के संपत्ती देशातील १ टक्के श्रीमंतांकडे
2 व्यावसायिकांसाठी व्हॉटसअॅपचे नवीन अॅप लाँच
3 ‘हे’ आहेत दोरीच्या उड्यांचे उपयोग
Just Now!
X