क्विड ही नेहमीच एक अत्यंत विश्वासार्ह कार म्हणून ओळखली जाते. खिशावर जास्त भार न पडता जास्तीत जास्त आराम व ड्रायव्हिंगचा मजा क्विड देते. नवीन क्विडमध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या असून अशी काही फीचर्स देण्यात आली आहेत, जी या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिसतील. विशेष म्हणजे अनेक नवनवीन फीचर्स देऊनही क्विडची किंमत मात्र वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे तरूणांमध्ये आधीच लोकप्रिय असलेली क्विड रेनाँची लोकप्रियता आणखीन वाढवेल यात काही संशय नाही.

सगळ्या आठ ट्रिम्स व प्रकारांमध्ये ही नवीन कार अत्यंत आकर्षक म्हणजे 2.66 लाख रुपये एक्स शोरूम, दिल्ली या किमतीपासून पुढे उपलब्ध आहे. एक लिटर व 800 सीसी अशा दोन्ही प्रकारात ही कार उपलब्ध आहे. एक लिटर मोटरमध्ये 67 बीएचपी व 91 एनएमचा टॉर्क मिळतो. तर लहान 800 सीसी कार 53 एचपी व 72 एनएमचा टॉर्क देते. दोन्ही इंजिनना 5-स्पीड मॅन्युएल गिअर बॉक्स आहे व 5-स्पीड ऑटोमॅटिक एएमटीचा पर्यायही आहे.

या 2018 रेनाँ क्विडमध्ये या श्रेणीतली सर्वोत्कृष्ट अशी सात इंचाची मीडियानेव ही टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आहे. या श्रेणीत फक्त क्विडमध्ये मिळणारी ही सुविधा आहे. प्रथमच देण्यात येणाऱ्या अन्य गोष्टींमध्ये रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर तसेच मागे व पुढे बिल्ट इन 12 वोल्टचं सॉकेट आहे. रियर माउंटेड आर्मरेस्ट (या श्रेणीत प्रथमच) अंतर्भागातला उत्कृष्ट अनुभव देते व स्पर्धेत अंतर्गत सजावट उठून दिसते.

बाहेरून दिसणाऱ्या बदलांचा विचार केला तर 2018 च्या रेनाँ क्विडमध्ये ड्युएल टोन बंपर्स, नवीन क्रोम फ्रंट ग्रिल व सी शेप डिझायनर लाइटिंग आहे. मधल्या व वरच्या श्रेणीमध्ये बॉडीच्या रंगाचे बंपर्स व फॉग लँप्स असून फूल व्हील कव्हर्स व ब्लॅकड आउट अलॉय व्हील्समध्ये पर्याय निवडायची सोय आहे. यामुळे रेनाँ क्विडच्या स्टाइलमध्ये भर पडली आहे. स्टोरेज ही क्विडसाठी कधीच समस्या नव्हती. या प्रकारामध्ये सर्वात चांगली अशी 300 लिटरची बूट स्पेस क्लिडमध्ये आहे.

एएमटी गियरबॉक्स सेंट्रल कन्सोलच्या डायलवरून नियंत्रित करता येतो. त्यामुळे रहदारी असताना जास्त त्रास न होता पुढे निसटण्यास ड्रायव्हरला मदत होते. ज्यावेळी गाडी चढावर उभी असेल त्यावेळी गाडी जागच्या जागी थांबण्यासही अधिक मदत मिळते ते वेगळंच. प्रचंड ट्रॅफिक असेल त्यावेळी ड्रायव्हरचा ताण हे फंक्शन खूपच कमी करतं. त्यातही विशेष म्हणजे या फंक्शनचा फायदा नवीन ड्रायव्हर्सना अधिक उपयुक्त ठरतो.

क्विडच्या अंतर्गत तसेच बाह्य सजावटीवर विशेष भर देताना खास आपल्या ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण सुविधा देणं ही रेनाँची खासियत आहे. बाह्य अंगाचा विचार केला तर, रेनाँ अनेक पर्याय देते. यामध्ये टेल लँपमध्ये क्रोमचा वापर, हेडलँप, बंपर प्रोटेक्टर आणि बंपर लायनर यांचा समावेश आहे. अन्य पर्यायांमध्ये साइड क्लॅडिंग, रूफ टेल्स व मॅड फ्लॅप्सचा समावेश आहे. अंतर्भागाचा विचार केला तर ग्राहक अँटी स़्लिप मॅट्स, सीट कव्हर्स, स्टीअरिंग व्हील कव्हर्स, केबिन फ्लोअर मॅट्स व इल्युमिनेटेड स्टील प्लेट्स यांची निवड करू शकतात. ग्राहक हवे ते निवडू शकेल अशा पर्यायांखेरीज 2018 क्विड बॉडी ग्राफिक डिझाइन्समध्ये अनेक पर्याय देते. त्यामुळे गर्दीमध्येही ग्राहकांना त्यांची गाडी उठून दिसत असल्याचा अनुभव मिळतो.

रेनाँ क्विड ही स्पर्धेत वेगळी उठून दिसते, याचं मुख्य कारण म्हणजे तिचं डिझाईन, ज्याची प्रेरणा एसयुव्हीपासून घेण्यात आली आहे आणि हे करताना तिच्या लांबी रूंदीच्या नियमांचीही योग्य काळजी घेण्यात आली आहे. त्याचं दृष्य स्वरूप म्हणजे लहान गाडी असूनही या श्रेणीमध्ये असलेला सगळ्यात जास्त म्हणजे 180 एमएमचा ग्राउंड क्लीअरन्स हे आहे. ज्यामुळे भारतात सगळीकडे असलेल्या खराब रस्त्यांवर गाडी चालवणंही  वाऱ्याच्या झुळकीसारखं वाटतं. रेनाँ क्विडमध्ये पॉवर स्टीअरिंग, इंजिन मोबिलायझर, पॉवर विंडोज, ट्रॅफिक असिस्ट, रियल आएलआर (इमर्जन्सी लॉकिंग रिट्रॅक्टर) आणि रिमोट कंट्रोल लाँकिंगदेखील आहे. त्यामुळे पैशाच्या चोख वसुलीचा विचार केला तर ही गाडी या श्रेणीमध्ये अन्य गाड्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे असं म्हणता येईल.\

शेवटी सांगायचं म्हणजे, या श्रेणीमध्ये सर्वोच्च सुविधा पुरवण्यामध्ये व तशीच फीचर्स देण्यामध्ये नवीन क्विडच्या बाबतीत रेनाँनं कुठलीही कसर सोडलेली नाही. या सगळ्याबरोबरच ज्याची तुलना होऊ शकत नाही अशी 4 वर्षे / 1 लाख किमी अशी वॉरंटी आहेच, त्यामुळे केवळ खरेदी करा हा एकच विचार योग्य ठरू शकतो.

कारबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.