रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी बाजारात मोफत फोन दाखल केल्यानंतर Detel (डिटेल) नावाच्या भारतीय कंपनीनेही अतिशय किफायतशीर किंमतीतील फोन बाजारात नुकताच दाखल केला आहे. जिओचा ४ जी फोन लाँच होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर मोबाईल कंपन्यांमध्ये स्वस्तातील फोन तयार करण्यासाठी चढाओढ सुरु झाली होती. जिओ फोनचे बुकींग २४ ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. त्याआधीच इतर कंपन्यांचे स्वस्तातील फोन बाजारात दाखल होत आहेत.

डिटेल कंपनीने नुकताच आपला एक फिचर फोन लाँच केला असून या मॉडेलचे नाव डी-१ आहे. कंपनीने या फोनची किंमत अतिशय कमी ठेवली असून या किंमतीतच ग्राहकाला होम डिलिव्हरी मिळू शकणार आहे. या फोनची किंमत अवघी २९९ रुपये इतकी आहे. डिटेल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ग्राहकांना फोन बुकिंग करता येणार आहे. इतक्या कमी किंमतीत असणाऱ्या या फोनमधील फिचर्सबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता अाहे. काय आहेत हे फिचर्स जाणून घेऊया…

१. सिंगल सिम फोन
२. डिस्प्ले १.४४ इंचाचा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये देण्यात आला आहे
३. एकदा पूर्ण चार्जिंग केले की हा फोन १५ दिवस चालू शकेल असा दावा कंपनीने केला आहे
४. टॉर्च आणि एफएमची सुविधा आहे
५. व्हायब्रेशन मोड आणि लाऊड स्पीकरची सुविधा देण्यात आली आहे
६. ४जी सुविधा नाही