28 February 2020

News Flash

जगातला सर्वात स्वस्त LCD TV लाँच, किंमत केवळ 3,999 रुपये

'डिटेल' या भारतीय कंपनीने जगातील सर्वात स्वस्त एलसीडी टीव्ही केला लाँच

‘डिटेल’ ही भारतीय कंपनी स्वस्त स्मार्टफोनसाठी ओळखली जाते. स्वस्त स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज लाँच करणाऱ्या या कंपनीने आता टीव्ही लाँच केला आहे. हा जगातला सर्वात स्वस्त LCD TV असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याची किंमत केवळ 3 हजार 999 रुपये ठेवण्यात आलीये.

Detel D1 असं या टीव्हीचं नाव असून यामध्ये 19 इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आलीये. कंपनीच्या संकेतस्थळावरुन किंवा मोबाइल अॅपद्वारे हा टीव्ही खरेदी करता येऊ शकतो. याशिवाय B2BAdda.com या संकेतस्थळावरुनही हा टीव्ही खरेदी करता येईल. या टीव्हीत एचडीएमआय आणि युएसबी पोर्ट आहे. युएसबी पोर्टला पेन ड्राइव्ह कनेक्ट करुन सिनेमे पाहता येतील. कारण यामध्ये मल्टिमीडिया सपोर्ट देण्यात आलाय. इनबिल्ट गेमिंगचा पर्याय देखील आहे. तसंच कंम्प्युटरशीही कनेक्ट करता येईल. याशिवाय पावर ऑडियो कंट्रोल आणि साउंड आउटपुट 8X2W आहे. टीव्ही खरेदी करताना ग्राहकाला एका वर्षाची वॉरंटी दिली जाईल.

‘टीव्हीच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि बाजारात स्वस्तात टीव्ही मिळत नाहीत. या टीव्हीद्वारे घराघरात टीव्ही पोहोचवण्याचा आमचा मानस आहे’, असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश भाटिया म्हणाले.
अन्य फिचर्स –
स्क्रीन साइझ – 19″ (48.3 CM)
एलसीडी एचडीआर रिझोल्यूशन – 1366 X 768
कॉन्ट्रास्ट रेशो – 3,00,000:1
ब्राइटनेस – > 200 NITS

First Published on November 29, 2018 8:07 pm

Web Title: detel worlds cheapest lcd tv launched for rs 3999
Next Stories
1 बजाजची Pulsar 150 Neon लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत
2 4,000mAh ची बॅटरी आणि ड्यूअल कॅमेरा, Honor 8C भारतात लाँच
3 Realme U1 भारतात लाँच, तब्बल 25 मेगापिक्सल्सचा कॅमेरा आणि बरंच काही
Just Now!
X