News Flash

Dhanteras 2016 : धनत्रयोदशीसाठीचे शुभ मुहूर्त

या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते

या दिवशी देवी लक्ष्मी बरोबरच गणपती आणि धन्वंतरीची देखील पूजा केली जाते.

वसुबारसनंतर येणा-या धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. भगवान धन्वंतरीच्या प्रकटीकरणाच्या दिवशी धनत्रोयदशी साजरी केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी बरोबरच गणपती आणि धन्वंतरीची देखील पूजा केली जाते. यादिवशी नवी वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. धनत्रोयदशीला सोने- चांदीची खरेदी केली जाते. यंदा धनत्रोदशीच्या पूजेचा मुहूर्त हा जवळपास ४५ मिनिटांचा आहे.
धनत्रोदशी पूजेचे मुहूर्त
यंदा धनत्रोदशीच्या पूजेचा मुहूर्त हा २८ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून सुरू आहे. तर ६ वाजून २० मिनिटांपर्यंत तो राहणार आहे. जवळपास ४५ मिनिटांचा हा पूजेचा मुहूर्त असणार आहे. धनत्रोयदशीला करण्यात येणा-या लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा ६.२९ ते ७. ५० पर्यंत असणार आहे.
धनत्रोदशी खरेदीचा मुहूर्त
धनत्रोदशी दिवशी सोन्या चांदीचे दागिने किंवा धातूच्या वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. आजही काही जण शुभ मुहूर्तावरच दागिन्यांची किंवा वस्तूंची खरेदी करतात. यंदा वस्तू खरेदी ही दूपारी १.५५ ते ३. ८ हा शुभमुहूर्त करता येणार आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी ६.२९ मिनिटे ते ८.१२ हा देखील शुभमुहूर्त राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 11:58 am

Web Title: dhanteras mahurat timings
Next Stories
1 दिन-दिन दिवाळी । गाई-म्हशी ओवाळी ।
2 कंपवात रुग्णांसाठी स्मार्ट ग्लोव्हज
3 Dhanteras 2016 : जाणून घ्या का साजरी केली जाते धनत्रयोदशी!
Just Now!
X