News Flash

Microsoft ने तब्बल 130 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतली Sony कंपनी? जाणून घ्या काय आहे सत्य?

व्हिडिओ गेमिंगच्या जगतात Xbox आणि PlayStation दोघांचंही वर्चस्व असल्याने दोन्ही कंपन्यांमधील स्पर्धा सर्वश्रूत...

( Express File Photo : Anuj Bhatia)

अमेरिकेची दिग्गज टेक कंपनी माइक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने (Microsoft Corporation) आपली विरोधी मल्टिनॅशनल कंपनी सोनी कॉर्पोरेशनच्या (Sony Corporations) सर्व विभागांना तब्बल १३० अब्ज डॉलरमध्ये खरेदी केल्याचं वृत्त स्पेनच्या एका न्यूज पोर्टलने दिल्याने काल(दि.२९) सकाळपासूनच नेटकरी आणि विशेषतः गेमर्समध्ये खळबळ उडाली.

माइक्रोसॉफ्टकडे स्वतःचा Xbox नावाचा गेमिंग प्लॅटफॉर्म आहे. या कॅटेगरीमध्ये माइक्रोसॉफ्टच्या Xbox ला सोनीच्या PlayStation कडून जबरदस्त टक्कर मिळते. त्यामुळे व्हिडिओ गेमिंगच्या जगतात दोघांचं वैर सर्वश्रूत आहे. याच कारणामुळे माइक्रोसॉफ्टने सोनीला खरेदी केल्याचं वृत्त आल्यानंतर गेमर्स चांगलेच हैराण झाले होते.

सत्य काय?
पण या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. सर्वप्रथम स्पेनच्या एका वेबसाइटने हे वृत्त दिलं. त्यानंतर माइक्रोसॉफ्टर्स नावाच्या एका वेबसाइटने हेच वृत्त शेअर केलं. इंग्रजीमध्ये भाषांतर झाल्यामुळे ही बातमी सोशल मीडिया चांगलीच व्हायरल झाली आणि गेमर्समध्ये एकच खळबळ उडाली. स्पेनच्या वेबसाईटने आपल्या वृत्तात बरेच डिटेल्स दिले होते. म्हणजे हा करार १३० अब्ज डॉलरमध्ये झाला असून सोनीसोबत विस्तार करण्यासाठी माइक्रोसॉफ्टने एक व्यापक योजना बनवली आहे, अशाप्रकारची माहिती त्यांनी दिली होती. पण, इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतरही सोनी किंवा माइक्रोसॉफ्ट यांच्याकडून या कराराबाबत कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही. इतका मोठा करार जो वर्षातला सर्वात मोठा करार ठरला असता आणि जगभरातील माध्यमांसाठी सर्वात मोठी बातमी ठरली असती पण स्पेनची एक वेबसाइट आणि एक-दोन ब्लॉग्सशिवाय कोणीच ही बातमी दिली नाही. एक-दोन माध्यमांनी सुरूवातीला ही बातमी दिली पण लगेचच त्यांनीही बातमी डिलीट केली. खरं म्हणजे स्पेनच्या वेबसाइटने २८ डिसेंबर रोजी हे वृत्त दिलं होतं. हा दिवस स्पेनमध्ये ‘Day of the Holy Innocents’ म्हणून साजरा केला जातो. हा एकप्रकारचा ‘एप्रिल फूल’ दिवस असतो. त्यामुळे या वृत्तात कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 8:41 am

Web Title: did microsoft really buy out sony including its playstation division for 130 billion dollars know fact check details sas 89
Next Stories
1 नासाच्या स्थापनेपासून तीन हजार शत्रू सैनिकांना ताब्यात घेण्यापर्यंत… बायडेन यांच्या त्या Achievements मागील सत्य काय?
2 अभ्यासावरुन पालक ओरडल्याने १४ वर्षीय मुलाने घरातील दीड लाख चोरले अन् गोवा गाठले; क्लबमध्ये पैसे उडवले पैसे
3 राजस्थान : ११ हजार लिटर दूध, दही, तूप मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान खड्ड्यात ओतलं
Just Now!
X