अनेकजण डिओड्रंट मारल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. शरिराला येणाऱ्या घामाच्या दुर्गंधीपासून इन्सन्ट रिलीफ मिळवण्यासाठी अनेकजण डिओड्रंट वापरतात. बरेचजण ऑफिसला जाण्याआधी आणि ऑफिसमधून निघातानाही डिओड्रण्ट्चा फवारा शरिरावर मारतातच. मात्र याच सुगंधी डिओड्रंटची मोठी किंमत मोजावी लागू शकते. जाणून घेऊयात कशाप्रकारे डिओड्रंटचा अती वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो..

अॅल्युमिनियममुळे होणार रोग
डिओड्रंटमधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे अॅल्यूमीनियम. अॅल्युमिनियममुळे एल्जाइमरचा आजार होऊ शकतो. तसेच हाडांशी संबंधित आजार, किडनीशी संबंधित आजारांसाठीही डिओड्रंटसमधील अॅल्युमिनियम कारणीभूत ठरते.

डिओड्रंट संप्रेरकांचे प्रमाण बिघडते
डिओड्रंटच्या अती वापराने संप्रेरकांचे प्रमाण बिघडू शकते. डिओड्रंटमधील पैराबीन्समुळे (इथेन, मिथेन प्रकारातील वायू) संप्रेरकांचा शरिरातील स्त्राव कमी किंवा जास्त होतो आणि त्यांचे प्रमाण बिघडते. शरिरातील महत्वाच्या क्रियांवर संप्रेरकांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते. मात्र अशाप्रकारे कमी अधिक प्रमाणात संप्रेरकांचा स्त्राव झाल्याने त्याचा दैनंदिन शारिरीक प्रक्रियांवर परिणाम होतो. प्रोपेलपॅराबीन, मिथाइलपॅराबीन, इथाइलपैराबीन किंवा बुटाइलपैराबीन नसलेलेच डिओड्रंट खरेदी करावेत.

घामाच्या ग्रंथी ब्लॉक
तांत्रिक दृष्ट्या डिओड्रंट तुमच्या शरिराला येणारा घामाचा दुर्गंध घालवतं नाही तर ते घामाच्या ग्रंथीला ब्लॉक करते. डिओड्रंटमधील अॅल्यूमीनियम त्वचेवरील बारीक छिद्रे (पोर्स) ब्लॉक करते त्यामुळे घाम येत नाही. त्यामुळे अती जास्त हलचाल किंवा क्रिया केल्यानंतर येणारा घाम शरीरामध्ये जमा होत राहतो आणि तो स्थायूंमध्ये साठून राहिल्यास कॅन्सर होण्याचा धोका संभावतो.

छातीचा (ब्रेस्ट) कॅन्सर
डिओड्रंटच्या सततच्या वापराने कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. डिओड्रंटमध्ये असणारी अॅस्ट्रोजेनिक संयुगे ब्रेस्टच्या स्थायूंवर परिणाम करतात. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.

प्रोपीलीन ग्लाइकॉलचा त्रास
डिओड्रंटमधील आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे प्रोपीलीन ग्लाइकॉल. एखाद्या पदार्थाची शोषून घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी याचा वापर होतो. प्रोपीलीन ग्लाइकॉल हे एक प्रकारचे न्युरोटॉक्झिन असून प्रोपीलीन ग्लाइकॉलमुळे शरिराला खाजही सुटते. केंद्रीय मज्जासंस्थेवर या रसायनाचा परिणाम होतो.