सध्याच्या काळात पाहायला गेलं तर आजची तरुणाई घरातील सकस आणि षौष्टिक पदार्थ खाण्यापेक्षा फास्टफूड खाण्याला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या आहारात मैदा किंवा तत्सम पदार्थांचा समावेश जास्त होताना दिसतो. मैद्याचे पदार्थ चवीला कितीही रुचकर आणि चविष्ट लागले तरीदेखील अतिरिक्त प्रमाणात मैदा खाणं हे शरीरासाठी घातक आहे. मात्र, आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण ब्रेड, फ्रॅन्क्री, केक, पेस्ट्री हे पदार्थ आवडीने खातात. परंतु, मैद्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक समस्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
अतिरिक्त प्रमाणात मैद्याचे पदार्थ खाण्याचे परिणाम
१. मैदा चिवट पदार्थ असल्यामुळे त्याचे पचन लवकर होत नाही. त्यामुळे पोटाचे विकार होतात.
२.आम्लपित्त
३. अपचन
४. मळमळ
५. मलावष्टंभ
६. पोटात गॅस होणे.
७. शरीरातील उष्मांकचं प्रमाण वाढल्यामुळे लठ्ठपणा
८. रक्तदाब
९.मधुमेह
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2020 3:53 pm