कुठेही जायचे असेल तरी आपण प्रेझेंटेबल असावं असं प्रत्येकाला वाटतं. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपला चेहरा. चेहऱ्याची त्वचा नितळ आणि चांगली दिसावी यासाठी मुख्यत: महिला अनेक प्रयत्न करताना दिसतात. बाह्य त्वचा चांगली दिसावी यासाठी आहार अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांबरोबरच आहाराच्या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तुमची त्वचा कोरडी किंवा तेलकट कशीही असली तरी ती उजळण्यासाठी उत्तम आहार महत्त्वाचा असतो. जंक फूड, तेलकट तसेच मसालेदार खाणे यांमुळे आरोग्यावर तर विपरित परिणाम होतोच पण त्वचेवरही त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. त्यामुळे त्वचा निर्जिव वाटू नये यासाठी आहारात ठराविक पदार्थांचा समावेश असायलाच हवा. तसेच तुम्ही जास्त तरुण दिसावे असे तुम्हाला वाटत असेल तर आहाराबाबत काळजी घेणे गरजेचे ठरते.

या गोष्टी असायलाच हव्यात

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

प्रोटीन – त्वचेतील पेशींना दुरुस्त करण्याचे काम प्रोटीनमुळे होते. त्यामुळे त्वचा चांगली होण्यासाठी आहारात प्रोटीनचा समावेश असणे आवश्यक असते. चिकन, अंडी, दुधाचे पदार्थ आणि ब्रोकोली यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्याने हे पदार्थ आहारात असायला हवेत.

फळे आणि भाज्या – फळे आणि भाज्यांमध्ये खनिजे आणि व्हिटॅमिन असतात. त्वचेचे आरोग्या चांगले राहण्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे.

धान्य – धान्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्वचा चांगली दिसावी यासाठी हे घटक आवश्यक असतात. त्यामुळे हातसडीचा तांदूळ, बाजरी, ज्वारी अशी सगळी धान्ये असायला हवीत.

दाणे आणि बिया – दाणे हे केवळ आरोग्यासाठीच चांगले असतात असे नाही तर त्वचेचे आरोग्य सुधारण्यामध्येही त्यांचा चांगला सहभाग असतो. आक्रोड, काजू, बदाम यांबरोबरच सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया त्वचेसाठी चांगल्या असतात.

तेल – आरोग्यदायी तेल हे त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल यांचा आहारात समावेश करावा.

पेये – उन्हाळ्याच्या दिवसांत तसेच एरवीही शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक असते. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होतेच पण त्वचेचे आरोग्य सुधारण्यासही त्यामुळे मदत होते. त्यामुळे दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. ग्रीन टी, हर्बल टी, नारळ पाणी, बदामाचे दूध, ताज्या फळांचा रस आहारात असायला हवे.

हे पदार्थ टाळा

* पनीर, कॉटेज चिज, क्रिम, बटर

* पांढरा तांदूळ, पांढरा ब्रेड, सातू, पास्ता

* प्रक्रिया केलेले मटण

* सोयाचे पदार्थ – टोफू, सोया मिल्क, सोया दही

* कृत्रिम साखर किंवा स्विटनर

* चहा, क़ॉफी, सोडा असलेली पेये, अल्कोहोल