पुरुष आणि स्त्रियांच्या हृदयात फरक असल्याचे बहुतेकवेळी म्हटले जाते. पण ते कसे याविषयी कोणालाच काही माहिती नसते. मात्र, एका संशोधनातून पुरुष आणि स्त्रियांच्या हृदयातील फरक सिद्ध झाला आहे. पंडुआ युनिव्हर्सिटीतील रुग्णालयात या विषयी अधिक संशोधन चालू आहे.
जेव्हा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा छातीपासून डाव्या हातापर्यंत वेदना सरकतात. तर महिलांना हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा छातीपासून पोटाकडे वेदना सरकतात. स्त्री आणि पुरुषांच्या हृदयामध्ये खूप फरक आहे. कॅन्सर, ओस्टियोपोरोसिस तसेच फारमेकोलॉजी यांमध्ये स्त्री-पुरूष यांच्या हृदयातील फरक लक्षात येतो, असे प्रो. जियोविनेला यांनी सांगितले. हृदयातील फरक हेच महिलांमधील आजार लवकर लक्षात न येण्यामागचे मूळ कारण आहे. त्यामुळे, ईसीजी, एनडाईम डॉइनेस्टिक टेस्ट तसेच अँजियोग्राफीमधून हा फरक लक्षात येत नसल्यामुळे महिलांना योग्य उपचार मिळत नाही.