डोळ्यांची शक्ती

⦁ मानवी डोळ्यामध्ये १ कोटी रंगांमधील सूक्ष्म फरक शोधण्याची क्षमता असते.

⦁ जगातील कोणत्याही उपकरणामध्ये किंवा संगणकामध्ये ही क्षमता आजमितीला नाही.
नाकामधील एअरकंडिशनर

⦁ नाक एखाद्या नैसर्गिक एअरकंडिशनर प्रमाणे असते. नाकातून श्वासावाटे आत जाणारी हवा जर अति थंड असेल तर ती उबदार केली जाते. जर उष्ण असेल तर ती थंड करून फुफ्फुसांकडे पाठवली जाते.

स्फोटक शिंक  

⦁ शिंक आल्यावर नाकातून बाहेर पडणारी हवा ताशी १६६ ते ३०० किलोमीटर वेगाने बाहेर पडते.

⦁ शिंकताना डोळे उघडे राहू शकत नाहीत.

कान-नाक-डोळ्याचे अनोखे विश्व 

⦁ डोळे केवळ बालपणातच पूर्ण विकसित होतात. त्यानंतर त्यांचा विकास होत नाही. नाक आणि कान यांच्यात प्रौढपणीही वाढ होऊ शकते.

⦁ कानांना १,००० ते ५०,००० हर्ट्झचा आवाज ऐकू येतो.

⦁ ध्वनीतरंगातील सूक्ष्म फरक कानांना ओळखू येतो.

दातांची बत्तीशी

⦁ मानवी दात पोलादाप्रमाणे भक्कम असतात, परंतु शरीराच्या इतर अवयवांची झीज झाल्यास ती जशी भरून येते, तशी दातांची झीज किंवा हानी भरून येत नाही.

तोंडातील लाळ

⦁ मानवी तोंडात दररोज १.७ लिटर लाळ स्त्रवते. ही लाळ अन्न पचवते.⦁ जीभेच्या पृष्ठभागावर १०,००० पेक्षा अधिक स्वाद ग्रंथी असतात

 पापण्यांची फडफड

⦁ डोळ्यामधील आर्द्रता टिकवण्यासाठी पापण्यांची उघडझाप होते.

⦁ पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या डोळ्यांची उघडझाप जास्त वेळा होते.