News Flash

लपून-छपून Porn बघणाऱ्यांचं आता काही खरं नाही…! प्रसिद्ध वेबसाइटचा डेटा गेला चोरीला

लपून-छपून Porn पाहणारे गोत्यात...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

इंटरनेटवर सर्रास Porn व्हिडिओ बघणारे युजर्स आता गोत्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण एका प्रसिद्ध पॉर्न वेबसाइटच्या युजर्सचा डेटा लीक झाला आहे. काही हॅकर्सनी पॉर्न वेबसाइटवरील युजर्सचे ई-मेल आयडी आणि इतर काही वैयक्तिक माहिती चोरी केली आहे.

लीक झालेल्या डेटामध्ये युजर्सचे नाव, युजरनेम, पासवर्ड आणि ई-मेल यासारख्या खासगी माहितीचा समावेश आहे. Cyber News च्या एका रिपोर्टनुसार, प्रसिद्ध पॉर्न वेबसाइट MyFreeCams चा डेटा लीक झालाय. धक्कादायक म्हणजे जवळपास २० लाख युजर्सचा डेटा लीक झाला असून या युजर्सची माहिती ब्लॅक मार्केटमध्ये विकण्याचा हॅकर्सचा प्रयत्न आहे. MyFreeCams या वेबसाइटनेही आपल्या युजर्सचा डेटा लीक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

एका मोठ्या फोरमला हा डेटा विकण्याचा हॅकर्सचा प्रयत्न असून त्या बदल्यात बिटकॉइनची मागणी केली जात आहे. 10 हजार युजर्सच्या डेटासाठी 1500 डॉलर बिटकॉइनची हॅकर्सनी मागणी केल्याचं समजतंय. युजर्सच्या चोरलेल्या डेटाचा वापर हॅकर्स विविधप्रकारे करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हॅकर्स युजर्सचा MyFreeCams वेबसाइटवरील टोकन बॅलेन्सही संपवू शकतात किंवा चोरलेल्या डेटाची भीती दाखवून युजर्सना ई-मेल किंवा अन्यप्रकारे ब्लॅकमेल करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दरमहिन्याला जवळपास सात कोटी युजर्स या वेबसाइटला भेट देतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 9:59 am

Web Title: difficulties for porn watchers elevated myfreecams site hacked to steal info of 2 million paying users sas 89
Next Stories
1 Poco च्या स्वस्त स्मार्टफोनची भारतात ‘डिमांड’, विक्रीचा आकडा 10 लाखांपार
2 Reliance Jio युजर्ससाठी ‘गुड न्यूज’, आता ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये मिळणार जास्त 4G डेटा
3 मारुती, महिंद्रानंतर Tata Motors ने दिला झटका; सर्व कारच्या किंमती वाढल्या
Just Now!
X