– शैलजा तिवले

डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वाधित हाताळल्या जाणाऱ्या मोबाइलच्या माध्यमातून करोना संसर्गाचा प्रसार होण्याचा संभव असल्याने रुग्णालयातील मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालणे गरजेचे आहे, तसेच त्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असल्याचे एका अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?

‘कोविड १९ अ‍ॅण्ड मोबाइल फोन हायजिन इन हेल्थकेअर सेटिंग’ या नावाने हा अभ्यास नुकताच ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. रुग्णांच्या सतत संपर्कात असलेले डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी हे दर १५ मिनिटांनी किंवा दोन तासातून एकदा मोबाइलचा वापर करतात. रुग्णालय आवारात वापरल्या जाणाऱ्या मोबाइलवर अधिक प्रमाणात विषाणूंचे वास्तव्य असते, असे पुरावेही अनेक अभ्यासांमध्ये मांडलेले आहेत. तर करोनाचे विषाणू हे धातू, प्लास्टिक, काचेच्या पृष्ठभागावर २ तास ते नऊ दिवसही टिकतात असे २२ अभ्यासांमधून स्पष्ट झाले आहे. बोलताना मोबाइलचा थेट चेहरा, डोळे आणि तोंडाशी संपर्क येतो. त्यामुळे हात जरी स्वच्छ केले असले तरी मोबाइलवरील विषाणू चेहरा किंवा तोंडामध्ये जाण्याची शक्यता असते, असे या अभ्यासात नमूद केले आहे.

आरोग्यसेवेत कार्यरत असणारे १०० टक्के कर्मचारी मोबाइलचा वापर करत असून यातील केवळ १० टक्के व्यक्ती क्वचितच फोन स्वच्छ करतात, असे भारतातील एका अभ्यासाचा दाखला देत यात मांडले आहे. मोबाइलचा वापर हा संसर्ग प्रसारामध्ये प्रभावशाली माध्यम असल्याचे व्यक्त करत याचा वापर करताना काय काळजी घ्यावी, हे देखील या अभ्यासात सांगितले आहे.

मोबाइचा पूर्णत: वापर न करणे सध्याच्या घडीला शक्य नाही. इसोप्रोपायल(७० टक्के) किंवा क्लोरॉक्सचा वापर करत निर्जंतुकीकरण करण्याची शिफारस काही मोबाइल कंपन्यांनी केली असल्याचेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइलच्या निर्जंतुकीकरणाची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची सूचना

मोबाइल पाण्याने स्वच्छ करणे शक्य नाही. तसेच ५० टक्क्याहून अधिक अल्कोहोल असलेल्या द्रवाने स्वच्छ केल्यास, त्यातील काही भाग निकामी होण्याची किंवा स्क्रीन खराब होण्याची शक्यता आहे. करोनाचे विषाणू ५५ टक्क्यांहून कमी अल्कोहोल असलेल्या द्रव्याच्या वापराने नष्ट होत नाहीत. तेव्हा मोबाईलचे निर्जंतुकीकरण कसे करावे, याची मार्गदर्शक तत्त्वे संबंधित कंपन्यांनी जाहीर करावीत, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने द्यावेत, असेही या अभ्यासात सूचित केले आहे.

रुग्णालय परिसरात मोबाइल वापरताना ही काळजी घ्या

– रुग्णालयात विशेषत: वॉर्ड, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग या ठिकाणी मोबाइलच्या वापरावर निर्बंध घालावेत.
– मोबाइलचा वापर करताना पारदर्शक मोबाइल कव्हरचा वापर करणे बंधनकारक करावे. चेहऱ्याशी थेट संपर्क टाळण्यासाठी हेडफोनचा वापर करावा.
– मोबाइल, हेडफोन दुसऱ्याला वापरास देऊ नयेत
– रुग्णालयात मोबाइलचा कमीत कमी वापर करण्यासाठी इंटरकॉम सुविधांच्या वापरावर भर द्यावा.
मोबाइल निर्जंतुकीकरण करण्याची प्रक्रिया
– स्वच्छ करण्यापूर्वी मोबाइल बंद करावा. तसेच मोबाइलचे कव्हर, वायर इतर गोष्टी वेगळ्या कराव्यात.
– स्वच्छ करण्यासाठी सुका आणि धूळमुक्त, मऊ कपड्याचा वापर करावा.
– बायोसाईडचे काही थेंब टाकून कपड्याने मोबाईलचे दोन्ही पृष्ठभाग स्वच्छ करावेत.
– निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रवाचा मोबाईलवर थेट वापर करू नये.
– निर्जंतुकीकरणासाठी ब्लीचचा वापर करू नये.