लहान मुलं ही अल्लड, निरागस असतात. त्यामुळे सहाजिकच ते त्यांच्या वयानुसार मस्ती, हट्टी करत असतात. मात्र अनेक वेळा मुलांनी शिस्त पाळावी, उगाच मस्ती करु नये यासाठी पालक त्यांना विविध मार्गाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. यात अनेक वेळा मुलांना एखाद्या गोष्टीची भीती दाखवली जाते. जसं की, मस्ती केली तर चटका देईन किंवा तुला तो राक्षस घेऊन जाईल. असं अनेक पालक आपल्या मुलांना घाबरवण्यासाठी करत असतात. मात्र काही वेळा असं करणं मुलांसाठी चुकीचं ठरु शकतं. यामुळे मुलांच्या बालमनावर परिणाम होत असतो.

त्यामुळेच जर मुलांना समजवायचं असेल तर प्रेमाने समजावण्याची गरज असते. तसंच लहान मुलांचं मन हे अत्यंत नाजूक असतं. त्यामुळे एखाद्या गोष्टीचा त्यांच्या मनावर थेट परिणाम होत असतो.