सॅमसंग कंपनीने मार्चमध्ये आपला बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M12 लाँच केला आहे. क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप, 90Hz रिफ्रेश रेट आणि 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असे अनेक शानदार फिचर्स असलेला हा फोन कंपनीने दोन व्हेरिअंटमध्ये (4जीबी आणि 6जीबी रॅम) आणलाय. Samsung Galaxy M12 हा कंपनीचा नवीन ‘बजेट’ स्मार्टफोन असून  ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरुन हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. अ‍ॅमेझॉनकडे या फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफर आहेत.

Samsung Galaxy M12 किंमत किती आणि काय आहे ऑफर ?
4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये सॅमसंगने हा फोन आणला असून याची किंमत अनुक्रमे 10 हजार 999 रुपये आणि 13 हजार 499 रुपये आहे. पण, या फोनच्या खरेदीवर एक हजार रुपये इंस्टंट डिस्काउंटची शानदार ऑफर आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा ईएमआयवर ही सवलत कंपनीकडून दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 9 हजार 999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो.

Samsung Galaxy M12 स्पेसिफिकेशन्स काय ?
Samsung Galaxy M12 या फोनमध्ये ड्युअल सिम कार्डचा सपोर्ट असून 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 16.55cm इन्फिनिटी-V डिस्प्ले मिळेल. शिवाय 8nm Exynos प्रोसेसरचा सपोर्ट या फोनला असेल. याशिवाय फोटोग्राफीसाठी ISOCELL प्लस टेक्नॉलजीसह 48 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासाह क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल, तसेच फोनमध्ये 6000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरीही मिळेल. 128जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज असलेल्या या फोनमधील स्टोरेज क्षमता माइक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेअटप आहे, यात 48 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्यासोबत 5 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सेल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर असा सेटअप आहे. याशिवाय सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सेलचा कॅमेराही आहे. अँड्रॉइड 11 वर आधारित One UI 3.1 वर कार्यरत असलेल्या या फोनमध्ये 8nm Exynos प्रोसेसरचा सपोर्ट आहे. तसेच फास्ट फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखे फिचर्सही फोनमध्ये आहेत.