मंदीचा सामना करणाऱ्या ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व विक्री वाढावी यासाठी विविध प्रकारची सवलत देत आहेत. टाटा मोटर्सनेही आपल्या विविध कारवर आता भरघोस सूट दिली आहे. यात टाटाच्या हॅरियर, बोल्ट, हेक्सा, सफारी स्टॉर्म SUV, नेक्सॉन, टिगोर, हेक्सा या कार्सवर सूट आहे.

जाणून घेऊया कोणत्या कारवर किती डिस्काउंट –

  • टाटाच्या हेक्सा या कारवर ग्राहकांना सर्वाधिक सवलत मिळत आहे. या करवर तब्बल १.५ लाख रुपयांची सवलत असून ही कार केवळ डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे.
  • टाटा टियागो या कारवर कंपनीकडून ४० हजार रुपयांची सवलत आहे.
  • टाटा टिगोर कारच्या पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिअंट्सवर ५७ हजार रुपयांची सवलत आहे.
  • टाटा नेक्सॉनच्या पेट्रोल व्हेरिअंटवर ३५ हजार आणि डिझेल व्हेरिअंटवर ४५ हजार रुपयांची सूट आहे.
  • टाटा जेस्ट कारवर ६५ हजार रुपये डिस्काउंट कंपनीकडून मिळत आहे.
  • टाटाच्या सफारी स्टॉर्म SUV कारवर कंपनीकडून विविध प्रकारे एकूण ६५ हजार रुपयांची सवलत मिळेल.
  • टाटा हॅरियर या लोकप्रिय कारवर देखील ६५ हजार रुपये डिस्काउंट आहे.
  • याशिवाय टाटा बोल्ट या कारवरही ६५ हजार रुपये सवलत आहे.