News Flash

Xiaomiच्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट, सात फेब्रुवारीपर्यंत ऑफर

सात फेब्रुवारीपर्यंत भरघोस सवलत

जर तुम्ही शाओमीचा (Xiaomi) स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी शानदार संधी आहे. कारण, शाओमीच्या mi.com या संकेतस्थळावर Mi Super Sale सुरू असून यात शाओमीच्या स्मार्टफोन्सवर 4,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळत आहे. हा सेल सात फेब्रुवारीपर्यंत असेल. सवलतीशिवाय शाओमी आपल्या Redmi Note 8 Pro, Redmi Note 7 Pro आणि Redmi K20 सीरीजवर नो-कॉस्ट EMI चा पर्यायही देत आहे.

आणखी वाचा : (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी)

ICICI क्रेडिट कार्ड EMI वर 5% इंस्टंट डिस्काउंट –
Mi.com ने आयसीआयसीआयच्या क्रेडिट कार्ड EMI व्यवहारावर 5 टक्के सवलत देण्यासाठी ICICI बँकेसोबत भागीदारी केली आहे. सेलमध्ये Redmi Note 8 Pro च्या किंमतीत कपात केलेली नाही, पण या फोनवर एक्सचेंज ऑफर आहे. या फोनच्या 6GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिअंटवर 1,000 रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल. तर, Redmi Note 7 Pro च्या 4GB रॅम+ 64GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी तुम्हाला 9,999 रुपये द्यावे लागतील. म्हणजे हा स्मार्टफोन 4,000 रुपयांच्या सवलतीसह mi.com वर उपलब्ध आहे.

19,999 रुपयात Redmi K20 –
Redmi Note 7 Pro (6GB रॅम+64GB स्टोरेज) फोन सेलमध्ये 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर या फोनमधील 6GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिअंट 13,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय सेलमध्ये Redmi K20 (6GB रॅम+64GB स्टोरेज)स्मार्टफोन 19,999 रुपयांच्या बेसिक किंमतीत खरेदी करता येईल. हे व्हेरिअंट 2,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. तर, Redmi K20 (6GBरॅम+128GB स्टोरेज) असलेले व्हेरिअंट 22,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच कंपनीकडून या फोनवर 2,000 रुपये अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंटही आहे. सेलमध्ये Redmi K20 Pro (6GB रॅम+128GB स्टोरेज) मॉडेल 3,000 रुपयांच्या कपातीसह 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, 8GB रॅम+256GB स्टोरेज मॉडेल 27,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 10:05 am

Web Title: discount on xiaomi smartphones in mi super sale sas 89
Next Stories
1 केटो आहाराचा फायद्याबरोबर तोटाही; मधुमेह वाढण्याचा धोका
2 Airtel च्या ग्राहकांना दणका, बंद झाली ‘ही’ Free सर्व्हिस
3 World Cancer Day : ‘ही’ लक्षणे आढळल्यास असू शकतो कर्करोग
Just Now!
X