News Flash

तुम्हीही नेहमी डिलिव्हरी बॉयला रेटिंग्ज द्यायला विसरता? जाणून घ्या, तुमच्या रेटिंग्जचं महत्त्व

डिलिव्हरी बॉय आपल्याला एक गोष्ट नेहमीच आवर्जून सांगतात. ती म्हणजे "आठवणीने रेटिंग द्या". पण आपण सोयीने विसरतो. एखाद्या डिलिव्हरी बॉयसाठी आपल्या त्या रेटिंगची किंमत, महत्त्व

एखाद्या डिलिव्हरी बॉयसाठी आपण देतो त्या रेटिंग्जची असणारे किंमत, महत्त्व तुम्हाला माहितीय का ? आर जे सायेमा यांनी डिलिव्हरी बॉईजशी संबंधित या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला वाचा फोडली आहे.

आपण ऑनलाईन ऑर्डर केलेली एखादी खास वस्तू, एखादा आवडता खाद्यपदार्थ आपल्याला लवकरात लवकर घरपोच मिळणं म्हणजे आनंदच. पण ती वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या व्यक्तीचा अर्थात डिलीव्हरी बॉयचा, त्यांच्या कष्टांचा, त्यांना येणाऱ्या समस्यांचा आपण कधी गांभीर्याने विचार केलाय का? आपण आपल्या कामात व्यस्त आहोत म्हणून त्यांना ताटकळत ठेवणं किंवा त्यांना यायला उशीर झाला म्हणून चिडणं, डाफरणं ह्यापलीकडे अनेकांचे विचार आणि वर्तन जातच नाहीत. त्यांनाही आपल्याकडून फार काही अपेक्षा नसतातच. पण एक गोष्ट मात्र ते आवर्जून सांगतात. ती म्हणजे “प्लीज आठवणीने रेटिंग द्या”. पण आपण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो. पण खरंच एखाद्या डिलिव्हरी बॉयसाठी आपण देतो त्या रेटिंगची किंमत तुम्हाला माहितीय का?

हा प्रश्न आताच विचारण्यामागचं कारण काय? हा विषय आत्ताच चर्चेत का येतोय? तर आर जे सायेमा हिने डिलिव्हरी बॉयशी संबंधित या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाला वाचा फोडली आहे. सायेमा हिने एका रेडिओ मुलाखतीच्या निमित्ताने काही डिलिव्हरी बॉयसोबत बोलल्यानंतर स्वतः ला जाणवलेल्या काही गोष्टींवर एका व्हिडिओच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. ह्या व्हिडीओमध्ये त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या समस्या सांगत सत्यपरिस्थिती समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच लोकांना एक महत्त्वाचं आवाहनही केले आहे. सायेमा यांचा हा व्हिडीओ हृदयस्पर्शी आणि प्रत्येकाला विचार करायला लावणारा आहे.

डिलिव्हरी बॉयसाठी आपली रेटिंग का आहे महत्त्वाची? सायेमा म्हणते…

  • आपल्या रेटिंग्जवरून ठरते कि संबंधित डिलिव्हरी बॉयला पुढच्या ऑर्डर्स मिळणार कि नाही.
  • तुम्हाला धक्का बसेल पण प्रत्येक ऑर्डरच्या डिलीव्हरी मागे डिलिव्हरी बॉयला फक्त २० रुपये मिळतात.
  • इतकेच नव्हे तर ह्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलचे पैसे देखील त्यांच्याच खिशातून जातात.

ह्या गोष्टी आठवणीने करा!

  • तुमची ऑर्डर घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयला कृपया ताटकळत ठेवू नका. तुमची ऑर्डर लगेच रिसिव्ह करा.
  • तुमच्या रेटिंग्जचं त्यांच्यासाठी असणारं महत्त्व लक्षात घ्या. त्यांना रेटिंग्ज द्या. जेणेकरून त्यांना पुढच्या जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळतील.

संवेदनशीलता आणि संयम ठेवा!

  • ऑर्डर डिलिव्हरीसाठी कधी त्यांना उशीर झालाच तर त्यांच्यावर चिडू नका. संयम ठेवा, थोडी संवेदनशीलता दाखवा. ट्रॅफिक, पाऊस ह्याचा फटका त्यांनाही बसतो, हे लक्षात घ्या.
  • त्यांच्या कष्टाचा, कामाचा आदर करा. त्यांनी दिलेली सर्व्हिस तुम्हाला आवडली तर किमान मनापासून कौतुक नक्की करा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 6:46 pm

Web Title: do not forget to give ratings to your delivery boy know the importance of your ratings gst 97
टॅग : Boy,Food Culture
Next Stories
1 तुम्हाला किडनीची समस्या असेल तर ‘हे’ पदार्थ खाऊ नका!
2 अॅमेझॉन प्राइम डेज मध्ये टेक्‍नोची कॅमॉन १७ सिरीज; ४८ मेगापिक्‍सल सेल्‍फी तर ६४ मेगापिक्‍सल क्‍वॉड रेअर कॅमेरा!
3 ‘या’ प्रीपेड फोन रिचार्ज प्लॅनसह मिळवा नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचं फ्री सबस्क्रिप्शन!
Just Now!
X