18 January 2019

News Flash

२०१७ मध्ये अॅपलने किती कमाई केली माहितीये?

नवनवीन सुविधा देत ग्राहकांना केले आकर्षित

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

अॅपलच्या कोणत्याही फोनबाबत किंवा इतर कोणत्याही उत्पादनांबाबत कायमच जोरदार चर्चा असते. श्रीमंतांचा फोन म्हणून आजही या फोनने आपली ओळख जपली आहे. अनेक आकर्षक आणि अपडेटेड व्हर्जन देऊन आपल्या ग्राहकांना खूश करण्याचा अॅपलचा कायमच प्रयत्न असतो. जगातील आघाडीच्या कंपन्यांमधील एक असलेल्या या कंपनीचा टर्नओव्हरही जास्तच असणार यात शंका नाही. मागच्या काही काळात भारतातच नाही तर जगभरात अॅपलची उत्पादने घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. साहजिकच अॅपलचा टर्नओव्हर वाढला असून कंपनीने गेल्या वर्षात २६५० कोटी डॉलर कमावले आहेत. आता इतकी रक्कम अॅपलने कशी कमावली असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल. तर आपल्या विविध उत्पादनांच्या माध्यमातून अॅपल ही कमाई करत असल्याचे नुकतेच समोर आले आहे.

२०१७ मध्ये आयओएस डेव्हलपर्सने २६५० कोटी डॉलर कमावले. ही कमाई २०१६ पेक्षा ३० टक्क्यांनी जास्त होती असेही कंपनीने सांगितले. आता इतकी कमाई केली असली तरीही आपल्या सेवा जास्तीत जास्त सुधारीत व्हाव्यात यासाठी कंपनीने बरेच बदलही केले आहेत. अॅपल स्टोअऱवरून अॅप आणि गेम डाऊनलोड किंवा खरेदी करण्यासाठी कंपनीने सुमारे ३० कोटी डॉलर खर्च केले आहेत. २००८ मध्ये कंपनीने अॅपल अॅप स्टोअऱ लाँच केले होते. त्यानंतर केलेला हा सर्वात मोठा खर्च असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपली कमाई वाढल्याचे कंपनीने सांगितले आहे. ग्राहकांनी या कालावधीत गेम्स आणि अॅप्स डाऊनलोड करण्यासाठी एकूण ८९ कोटी डॉलर कंपनीला मिळवून दिल्याचेही अॅपलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी अॅपलचे iPhone 6, iPhone 6s, iPhone SE आणि आता iPhone 7 हे फोन स्लो झाले होते. त्यानंतर कंपनीने काही लोकांना अॅपलच्या बॅटरीची रिप्लेसमेंटही दिली. यासाठी अॅपलने सार्वजनिक पद्धतीने माफी मागितली होती. याशिवाय नव्याने येणारे अॅपलचे फोन ड्युएल सिमचे असतील असेही सांगण्यात आले होते. याशिवाय ‘एलटीई’ तंत्रज्ञानाच्या मदतीने अॅपलचे कनेक्टीव्हीटी फिचर्स येत्या काळात आणखीन मजबूत होतील असा दावाही कंपनीने केला होता.

First Published on January 9, 2018 1:37 pm

Web Title: do you know how much apple earn in last year