News Flash

हृदयासाठी गुणकारी काळा चहा!

सवय, आतिथ्य, टाइमपास, तरतरी अशा अनेक सबबींखाली चहा प्यायला जातो.

| August 18, 2013 12:26 pm

सवय, आतिथ्य, टाइमपास, तरतरी अशा अनेक सबबींखाली चहा प्यायला जातो. कित्येक कार्यालयात साध्या चहाऐवजी काळा चहा दिला जातो. सध्या लोक साधा चहा बंद करुन काळा चहा घेणे पसंद करत आहेत. आता, याच काळया चहा पिण्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी होऊ शकते, असे एका परिक्षणात आढळले आहे. काळ्या चहात आढळणारी संयुगे हृदयरोग टाळण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. त्यामधील फ्लाओनाईड क्युरेसिटीन घटक रक्तवाहिन्यांचे होणारे नुकसान कमी करू शकतात. उदंरांच्या रक्तवाहिन्यांमध्ये यावर प्राथमिक अभ्यास करण्यात आल्याचे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीचे डॉ. नाताली वॉर्ड आणि प्रा. केविन क्रॉफ्ट यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 18, 2013 12:26 pm

Web Title: drinking black tea may protect your heart
टॅग : Lifestyle
Next Stories
1 लहानपणी दूध पिण्याचा वृद्धावस्थेत फायदा
2 मुलांमधील आक्रमकतेला सॉफ्ट ड्रिंक्सही कारणीभूत!
3 ऍलर्जी, अस्थमा असणाऱया मुलांना मानसिक निष्क्रियतेचा धोका!
Just Now!
X