27 November 2020

News Flash

आनंदी गाईंकडून अधिक पौष्टिक दूध

आनंदी राहण्याचा मानवाच्या आरोग्यावर उत्तम परिणाम होतो हे आतापर्यंत माहीत होते.

| July 17, 2016 01:25 am

प्रातिनिधिक छायाचित्र

आनंदी राहण्याचा मानवाच्या आरोग्यावर उत्तम परिणाम होतो हे आतापर्यंत माहीत होते. पण प्राण्यांमध्येही हा परिणाम दिसून येतो. आनंदी गाईंनी दिलेल्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक असते असे एका अभ्यासात दिसून आले आहे. दूध हा मानवाच्या आहारातील महत्त्वाचा घटक असल्याने आणि कॅल्शियम हे उपयोगी पोषणद्रव्य असल्याने या अभ्यासाला विशेष महत्त्व आहे.

दुधाचे पोषणमूल्य वाढवणे हे दुग्धव्यवसायापुढील मोठे आव्हान आहे. त्या दृष्टीने सतत काही ना काही संशोधन होत असते. त्याचाच भाग म्हणून अमेरिके तील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील संशोधक लॉरा हर्नादेझ आणि पथकाने या विषयावर संशोधन केले. त्याचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ एंडोक्रायनोलॉजी’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

गाईंना हायपोकॅल्सिमिया या रोगाची लागण झाल्याने त्यांच्या दुधातील आणि रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते असे यापूर्वीच्या संशोधनात दिसले होते. मात्र ते रोखण्यासाठी काय करता येईल हे आजवर माहीत नव्हते. या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांनी होलस्टीन आणि जर्सी या जातीच्या गाईंच्या शरीरात आनंद उत्पन्न करणाऱ्या द्रव्याचे इंजेक्शन दिले. त्याचे शरीरात अभिक्रिया होऊन सिरोटोनिन या द्रव्यात रूपांतर झाले. सिरोटोनिनमुळे शरीरात आनंदी भावना उत्पन्न होतात हे उंदरांवरील संशोधनातून माहिती होते. तसाच परिणाम गाईंवरही झाल्याचे दिसून आले. सिरोटोनिनमुळे गाई आनंदी राहून त्यांच्या दूध व रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. दोन्ही प्रकारच्या गाईंमध्ये मात्र वेगवेगळा परिणाम दिसला. सिरोटोनिनमुळे होलस्टीन गाईंच्या रक्तात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम तयार झाले. तर जर्सी गाईंच्या बाबतीत रक्तापेक्षा दुधात अधिक कॅल्शियम दिसले. या अभ्यासामुळे मानवाला कॅल्शियमची गरज भागवण्याचा नवा मार्ग मिळाला आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 1:25 am

Web Title: drinking milk healthy for humans
Next Stories
1 फॅशनबाजार : केसांची आगळी स्टाइल!
2 बालपणात अल्झायमर जनुकांमुळे मेंदू आकुंचनाचा धोका
3 पास्तामुळे लठ्ठपणावर नियंत्रण
Just Now!
X