26 October 2020

News Flash

या घरगुती उपायाचा वापर करुन अशी घ्या कोरड्या केसांची काळजी

कोणताही साईड इफेक्टही नाही

सध्या प्रदूषण, शाम्पूचा वाढता वापर ही केस कोरडे होण्याची कारणे असू शकतात. फास्ट फूडचे वाढलेले सेवन हेही केसांचा पोत बिघडण्याचे एक मुख्य कारण आहे. कोरड्या केसांना सांभाळणे ही एक मोठी जोखीम असते. या समस्येवर उपाय म्हणून लोक सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. मात्र त्याचे केसांवर दुष्परिणाम होण्याचीही शक्यता असते. या सौंदर्यप्रसाधनांपेक्षा घरातील वस्तू वापरल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होतो. त्याचे कोणतेही साईड इफेक्टही होत नाहीत आणि केसांचे पोषण होण्यासही त्याची चांगली मदत होते.

१. घरगुती गरम तेलाचे उपचार

यासाठी तुम्हाला दोन चमचे बदाम तेल, ऑलिव्ह ऑईल आणि २ चमचे खोबरेल तेल लागते. ही सगळी तेले एकत्र करुन ती थोडीशी कोमट करा. मग या तेलाने मसाज करा आणि केस टॉवेलने बांधून ठेवा.

२. अंड्याचा बलक आणि पाणी

यासाठी तुम्हाला २ अंड्यांचे बलक लागतील. हे बलक वाटीत घेऊन त्यामध्ये ३ चमचे पाणी घाला. हे मिश्रण योग्य पद्धतीने ढवळा. हे मिश्रण ३० मिनिटांसाठी केसांना लावून ठेवा. त्यानंतर डोके साध्या पाण्याने धुवा.

३. अंडे, दही आणि मधाचे मिश्रण

२ अंडी, १ चमचा मध आणि २ चमचे दही घ्या. आधी अंडे फेटून घ्या त्यानंतर त्यात मध आणि दही घाला. त्याची चांगली पेस्ट झाल्यावर ती केसांना लावून ठेवा. ३० मिनिटांनी केस साध्या पाण्याने धुवून टाका.

४. मध आणि व्हेजिटेबल ऑईल

यासाठी दोन चमचे मध आणि दोन चमचे व्हेजिटेबल ऑईल गरजेचे आहे. ही पेस्ट केसाला १५ मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर शाम्पूने केस धुवून टाका. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 3:42 pm

Web Title: dry hair treatments from your kitchen nck 90
Next Stories
1 Airtel Independence Day Offer : फ्री मिळेल तब्बल 1000 जीबी अतिरिक्त डेटा, जाणून घ्या डिटेल्स
2 तब्बल 100 तासांचा बॅटरी बॅकअप ; अमेरिकी कंपनीने भारतात लाँच केले ‘वायरलेस ईअरबड्स’
3 घरवापसी? टाटा समूह एअर इंडिया विकत घेण्याच्या तयारीत
Just Now!
X