News Flash

थंडीमुळे फाटलेले ओठ आणि पायांच्या भेगांसाठी काय कराल?

रुक्ष त्वचा, ओठ फुटणे, पायाला भेगा पडणे यावर काय करता येईल जाणून घ्या

ओठ आणि पाय

थंडी न आवडणारी व्यक्ती सापडणे दुर्मिळ. गुलाबी थंडीची मजा काही वेगळीच असते. काहींजणांना ब्लँकेटच्या आत शिरून सुट्टीच्यादिवशी बेडमध्ये पडून राहायला आवडते, तर काहीजण सकाळच्या गारव्यात नियमितपणे मॉर्निंग वॉकचा आनंद घेताना दिसतात. पहाटे अथवा रात्री उशिरा थंडीत गरमागरम चहा घेणे म्हणजे अनेकांसाठी जणू सोहळाच असतो. थंडीचा आनंद लुटत असताना या वातावरणाचा शरीरावर काही विपरीत परिणामदेखील होत असतो. रुक्ष त्वचा, ओठ फुटणे, पायाला भेगा पडणे त्वचेशीनिगडीत हे प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. थंडीचा आनंद घेताना यावर कशी मात करावी यासाठी येथे देण्यात आलेल्या काही टिप्स लाभदायक ठरतील.

त्वचा खोलवर मॉश्चराईज ठेवणे गरजेचे : थंडीत रुक्ष पडणाऱ्या त्वचेची चांगल्याप्रकारे काळजी घेण्यासाठी ‘स्किन केअर’ ट्रीटमेंट घेणे शक्य नसल्यास ‘कोको बटर क्रिम’चा वापर करणे उत्तम राहील. या क्रिमच्या वापराने केवळ शरिराला सुगंधच प्राप्त होतो असे नाही, तर नियमित वापराने क्रीम खोलवर जात त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते. दुसरा पर्याय म्हणजे आंघोळीपूर्वी ऑलिव्ह ऑइलने शरिराला हलक्या हाताने मसाज करणे. यामुळे शरिरातील मॉश्चर कायम राहाण्यास मदत होऊन त्वचा मऊ राहते. चेहऱ्यासाठी त्वचेतील ओलावा कायम ठेवणाऱ्या क्रिमची निवड करा.

मुलायम ओठांसाठी : अनेकजण फुटलेल्या ओठांना पेट्रॉलियम जेली लावतात. परंतु, हा पर्याय खरोखरीच योग्य आहे का ही विचार करण्याची गोष्ट आहे. त्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ उत्पादनांचा वापर करावा. याच्या वापराने त्वचेतील ओलावा कायम राहाण्याबरोबरच सूर्याच्या दाहकतेपासून त्वचेचा बचाव होण्याबरोबरच चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी होण्यासदेखील मदत होते.

पायांच्या भेगांवरील उपाय : पायांच्या भेगांना थंडीत शरीरातील ओलावा कमी होत असल्याने प्रामुख्याने त्वचेवर याचा विपरित परिणाम होतो. थंड हवामानाचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो तो टाचांवर. पायांवरील भेगामुंळे काहींना तर चालणेदेखील कठीण होते. रात्री झोपण्यापूर्वी ग्लिसरिन आणि गुलाब पाण्याने रोज हलका मसाज घेतल्यास आश्चर्यकारक फरक जाणवेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 3:35 pm

Web Title: dry lips and feet in winter treatment scsg 91
Next Stories
1 जिओच्या ग्राहकांना झटका; मोबाईल सेवांचे दर वाढवण्याची कंपनीकडून घोषणा
2 पेरूइतकीच पेरूची पानेही गुणकारी, जाणून घ्या फायदे
3 WhatsApp वर तुम्हाला एखादा व्हिडीओ आला असेल, तर सावध व्हा…
Just Now!
X