वडापाव आणि मुंबईचं एक वेगळच नातं आहे. मुंबईची शान म्हणजेच वडापाव असे वडापाव प्रेमी नेहमीच बोलतात. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची देसीगर्लच्या सोना या रेस्टॉरंटमध्ये वडापाव मिळत असल्याचे आपल्याला कळले. या आधी आपण गोल्ड प्लेटेड मिठाई बद्दल ऐकलं असेल पण गोल्ड प्लेटेड वडापाव सुद्धा असू शकतो, असा कधी विचार तरी केला होता का? हो तुम्ही वाचलतं ते खरं आहे. आता दुबईतील लोकांना मुंबईतील वडापावचा आनंद घेता येणार आहे, मात्र थोड्या हटके स्टाईलमध्ये त्यांना गोल्डप्लेटेड वडापाव मिळणार आहे.

या गोल्ड प्लेटेड वडापावचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ O,Pao या रेस्टॉरंटच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत वडापाव हा लाकडाच्या बॉक्समध्ये असल्याचे दिसत आहे. हा जगातील पहिला २२ कॅरेटचा वडापाव आहे आणि हा वडापाव ट्रफल बटर आणि चीजने भरलेला आहे. हा वडापाव आपल्याला रताळ्याच्या फ्राईज आणि लिंबूपाण्यासोबत दिला जातो.

आणखी वाचा : प्रियांका अमेरिकावासियांना खाऊ घालतेय ‘मुंबईचा वडापाव’, किंमत ऐकून पळून जाईल भूक

 

View this post on Instagram

 

A post shared by O’Pao (@opaodxb)

O,Pao हे रेस्टॉरंट करमा आणि अल क्वॉज या ठिकाणी आहे. या गोल्ड प्लेटेड वडापावची किंमत ही ९९ एईडी म्हणजेच १९७० रुपये आहे. हा वडापाव फक्त डाइन-इनसाठी उपलब्ध आहेत. या आधी दुबईमध्ये गोल्ड प्लेटेड बर्गर मिळत होता. या बर्गरला २४ कॅरेटचं सोन असल्याचे म्हटले जाते.