दुकाटीने भारतीय बाजारात आपली फ्लॅगशिप मोटरसायकल मल्टीस्ट्रेडा 1260 लॉन्च केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या बाइकची चांगलीच चर्चा रंगली होती. मल्टीस्ट्रेडा 1260 ही एक पावरफुल अॅडव्हेंचर बाइक आहे. यामध्ये 1,262 सीसीचं एल ट्विन इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 158 बीएचपी पीक पावर आणि 129.5 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. इंजिनमध्ये 6 स्पीडचा गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

भारतीय बाजारात या बाइकला दोन व्हेरिअंट्समध्ये लॉन्च करण्यात आलंय. यामध्ये मल्टीस्ट्रेडा 1260 व्हेरिअंटची किंमत 15.99 लाख रुपये (एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे, तर जास्त स्पेसिफिकेशन असलेल्या 1260 S ची किंमत 18.06 लाख रुपये (एक्स शोरूम) ठेवण्यात आली आहे.

फिचर्स –
मल्टीस्ट्रेडा 1260 मध्ये इलेक्ट्रॉनिक पॅकेजसह ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली कंट्रोल, क्रूज कंट्रोल, ABS, कॉर्नरिंग ABS देण्यात आले आहे. याशिवाय मल्टीस्ट्रेडा 1260 मध्ये डुकाटीच्या मल्टीमीडिया सिस्टिमसह कलर TFT डिस्प्ले, कॉर्नरिंग लॅप्स, इलेक्ट्रॉनिक शाइहुक सस्पेंशन आणि क्विकशॉफ्टर आहे.

दुकाटी मल्टीस्ट्रेडा 1260 ची भारतात ट्रायंफ टायगर 1200 या बाइकसोबत स्पर्धा होण्याची शक्यता आहे. ट्रायंफने नुकतीच आपली फ्लॅगशीप अॅडव्हेंचर मोटरसायकल टायगर 1200 लॉन्च केली आहे. या गाडीचं केवळ XCx व्हेरीअंट भारतात लॉन्च करण्यात आलंय. कंपनीने या बाइकची किंमत 17 लाख रुपये(एक्स शोरुम) ठेवली आहे.