Yamaha ने आपल्या दोन लोकप्रिय बाइक्स Yamaha FZ-S V3 FI आणि Yamaha FZ V3 FI च्या एकूण 7,757 युनिट(गाड्या) परत मागवल्या आहेत. या बाइक्सच्या रिअर-साइड रिफ्लेक्टर सदोष असल्याचं जाणवल्यानंतर या गाड्या रिकॉल करण्यात आल्या आहेत. ही उणिव कंपनीकडून मोफत दुरूस्त केली जाईल. परत मागवण्यात आलेल्या गाड्या ऑक्टोबर 2019 नंतर मॅन्युफॅक्चर करण्यात आल्या आहेत.

रिअर-साइड रिफ्लेक्टरमध्ये असलेला दोष किंवा उणिवा यामाहाच्या कोणत्याही अधिकृत डिलरशीपमध्ये दुरूस्त करता येणार आहेत. यासाठी ग्राहकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परत मागवलेल्या गाड्यांच्या मालकांशी कंपनी स्वतःच संपर्क साधणार आहे.

यामाहाने यावर्षी नोव्हेंबरमध्ये FZ आणि FZ-S V3.0 बीएस-6 आवृत्ती लाँच केली. दोन्ही बाइक्समध्ये 149cc, सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 7,250rpm वर 12.4hp ची ऊर्जा आणि 5,500rpm वर 13.6Nm पीक टॉर्क निर्माण करतं. इंजिनशिवाय बाइक्सच्या बीएस-6 मॉडलमध्ये काहीही बदल केलेल नाही. दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेकसह सिंगल चॅनल एबीएस आहे.

कलर आणि किंमत
यामाहा एफजेड-एफआय दोन कलर- मेटॅलिक ब्लॅक आणि रेसिंग ब्ल्यूमध्ये उपलब्ध आहे. या बाइकची एक्स शोरूम किंमत 99,200 रुपये आहे. तर, एफझेडएस-एफआय पाच कलर पर्यायांमध्ये असून एक्स शोरूम किंमत 1,01,200 रुपये आहे.