12 August 2020

News Flash

रद्द झाला Redmi Note 9 Pro Max चा पहिला सेल, ‘शाओमी’ची घोषणा

Redmi Note 9 Pro Max चा पहिला सेल रद्द...

‘शाओमी’ने गेल्या आठवड्यात भारतात ‘रेडमी नोट 9 प्रो’ आणि ‘रेडमी नोट 9 प्रो मॅक्स’ हे दोन ‘बजेट’ स्मार्टफोन लाँच केले. यातील रेडमी नोट 9 प्रो सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला होता. पण, रेडमी नोट 9 प्रो मॅक्स उद्या(दि.24) पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार होता. त्यातच ‘रेडमी नोट 9 प्रो’हा फोन पहिल्याच सेलमध्ये अवघ्या 90 सेकंदात आउट ऑफ स्टॉक झाल्यामुळे ग्राहकांच्या ‘रेडमी नोट 9 प्रो मॅक्स’च्या सेलकडे नजरा लागल्या होत्या. मात्र, उद्याचा हा सेल पुढे ढकलण्याचा निर्णय कंपनीने घेतलाय.

करोना व्हायरसमुळे देशात अनेक शहरे लॉकडाउन असल्याने मॅक्स व्हेरिअंटचा सेल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं शाओमीकडून सांगण्यात आलं आहे. शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली. पण, पुन्हा कधी सेल आयोजित केला जाईल याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. तर,’रेडमी नोट 9 प्रो’चा सेल रद्द करण्यात आलेला नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले.

रेडमी नोट 9 प्रो या फोनसाठी दुपारी 12 वाजेपासून Mi.कॉम आणि अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर सेल सुरू आहे. रेडमी नोट 9 प्रो मॅक्सच्या 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, रेडमी नोट 9 प्रोच्या 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 999 रुपये व 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये आहे.

Redmi Note 9 Pro Max आणि Redmi Note 9 Pro: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स :
या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात NavIC सपोर्ट आहे. NavIC हे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने(ISRO)विकसीत केलेले तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे जीपीएससाठी ‘मेड इन इंडिया’ पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. जीपीएसच्या तुलनेत NavIC अत्यंत अचूक माहिती देईल, असा ISRO चा दावा आहे. ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये 6.67 इंच फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम असून फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. तर मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप असून यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, 8 मेगापिक्सल सेकंडरी अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सल मॅक्रो शूटर आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसरचे अन्य तीन कॅमेरे आहेत. एमआययूआय 11 सोबत अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या रेडमी नोट 9 प्रो मॅक्समध्ये फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आले आहे. याशिवाय फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5020mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड, 3.5 एमएम ऑडियो जॅक आणि युएसबी टाइप-सी यांसारखे अन्य फीचर्स आहेत. तर, रेडमी नोट 9 प्रोमध्ये 6 जीबी रॅम आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 1:47 pm

Web Title: due to coronavirus lockdowns redmi note 9 pro max first sale postponed sas 89
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus: “आम्ही सर्व आशा सोडून दिल्यात” म्हणत खरंच इटलीचे पंतप्रधान रडले का?; जाणून घ्या सत्य
2 ‘वर्क फ्रॉम होम’साठी Vodafoneचे तीन भन्नाट प्लॅन, दररोज 3GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंगही
3 ‘करोना’मुळे इंटरनेटचा वापर वाढला, Amazon Prime ने घेतला मोठा निर्णय
Just Now!
X