26 February 2021

News Flash

FB चा मोठा दणका; ऑस्‍ट्रेलियात न्‍यूज सर्व्हिस केली बॅन, स्वतःचं पेजही केलं ब्‍लॉक

ऑस्ट्रेलियात फेसबुकने बातम्या पाहण्यास, शेअर करण्यास घातली बंदी

जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने ऑस्ट्रेलियामध्ये आपली बातम्यांची सेवा बंद केली आहे. गुरूवारी फेसबुककडून याबाबत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियामधील युजर्सना फेसबुकच्या माध्यमातून न्यूज पोस्ट बघता येणार नाहीत किंवा शेअरही करता येणार नाही.

फेसबुक आणि गुगलकडे ऑस्‍ट्रेलियातील बातम्यांसाठी शुल्क आकारण्याचा नवा कायदा लागू करण्याच्या विचारात ऑस्ट्रेलियाचं सरकार आहे. प्रस्तावित नवीन कायद्यानुसार, फेसबुक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यम कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. या मीडिया लॉवरुन फेसबुकचा ऑस्ट्रेलिया सरकारशी संघर्ष सुरू आहे. हे प्रकरण आता एवढं वाढलंय की, फेसबुकने ऑस्ट्रेलियामधील आपले पेज देखील बंद केले आहे.

प्रस्तावित कायद्याविरोधात ही बंदी घातली जात असल्याचे फेसबुकने म्हटले. फेसबुकच्या या निर्णयाचा फटका हवामान विभाग, आरोग्य विभाग आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना बसला आहे. तसेच ऑस्ट्रेलियामध्ये असलेल्या युजर्ससोबतच ऑस्ट्रेलियाबाहेर असलेल्यांनाही फेसबुकवर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच बातमी वाचता येत नाहीयेत. हवामान किंवा इतर सेवांशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी ट्विटरचा आणि विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, या कायद्याचा मसुदा तयार करणारे ऑस्ट्रेलियातील मंत्री जोश फ्रायडनबर्ग यांनी गेल्या आठवड्यात माध्यमांचे प्रतिनिधी, फेसबुकचे सीईओ मार्क झकेरबर्ग, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली होती. तर, जर असा कोणता कायदा अस्तित्वात आला तर आमची सेवा वापरता येणार नाही असा इशारा यापूर्वीच गुगल आणि फेसबुकने ऑस्ट्रेलियाला दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 1:32 pm

Web Title: due to new media law facebook blocks news sharing in australia sas 89
Next Stories
1 काय? फोटोत दिसणारी ‘ही’ व्यक्ती पुरुष नाही…मग? ; जाणून घ्या फोटोमागील सत्य
2 मॅग्नाईट.. खडतर मार्गावरही सुसाट
3 रात्री मोफत वापरा अनलिमिटेड इंटरनेट डेटा, व्होडाफोन-आयडियाने आणली धमाकेदार ऑफर
Just Now!
X