सुपरबाइक बनवणारी इटलीची कंपनी डुकाटीने स्क्रॅम्बलर मोटरसायकलची नवी आवृत्ती बाजारात आणली आहे. 7.89 लाख ते 9.93 लाख (एक्स-शोरुम) इतकी या बाइकची किंमत ठेवण्यात आली आहे. स्क्रॅम्बलरच्या मालिकेत आयकॉन, फुल थ्रोटल, कॅफे रेसर आणि डेझ0र्ट स्लेड यांसारखे मॉडल्स आहेत.

कंपनीच्या जाहिरातीनुसार नव्या आयकॉनची किंमत 7.89 लाख रुपये, फुल थ्रोटलची किंमत 8.92 लाख रुपये, कॅफे रेसरची किंमत 9.78 लाख रुपये आणि डेझर्ट स्लेडची किंमत 9.93 लाख रुपये आहे. कंपनीच्या देशातील सर्व 9 डिलरशिपमध्ये बाइकसाठी बुकिंग सुरू झाली आहे.

सर्व नव्या डुकाटी स्क्रॅम्बलर बाइक्स स्पोर्टिंग डिझाइन आणि बॉश ड्युअल चॅनल कॉर्निंग ABS सह सादर करण्यात आल्या आहेत. जुन्या बाइकच्या तुलनेत या नव्या अपडेटेड बाइक्समध्ये डिझाइनच्या बाबतीत थोडाफार बदल करण्यात आला आहे पण मॅकेनिकली कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व बाइक्समध्ये 803cc L-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 73bhp का पावर आणि 67nm टॉर्क जनरेट करतं. बाइकमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. जलदगतीने गिअर बदलता यावेत यासाठी हायड्रोलिकच्या आधारे कंट्रोल होणारे क्लच देण्यात आलेत. नव्या डुकाटी स्क्रॅम्बलर बाइक्सच्या हेडलाइटमध्ये ग्लास लेंस आहेत. तसेच यामध्ये LED DRL आणि LED टर्न इंडीकेटर्स आहेत.