News Flash

आजपासून Aadhaar प्रमाणे वोटर कार्डची पीडीएफ कॉपीही करता येणार डाउनलोड, जाणून घ्या प्रक्रिया

निवडणूक आयोगाची e-EPIC सुविधा...

( संग्रहित छायाचित्र )

जर तुमचं मतदान ओळखपत्र हरवलं असेल तर त्याची डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्लालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. केंद्रीय निवडणूक आयोग सोमवारपासून e-EPIC सुविधा सुरू करत आहे. याद्वारे तुम्ही घरबसल्या मतदार ओळखपत्राची पीडीएफ कॉपी डाउनलोड करु शकाल. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त डिजीटल मतदान ओळखपत्राची सुरूवात होत आहे.

ही सुविधा लाँच झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय मतदार ओळखपत्र तुमच्या मोबाइल फोन किंवा पर्सनल कंम्प्युटरवर डाउनलोड करु शकतात. याशिवाय हे इ-वोटर आयडी कार्ड डिजिटल लॉकरमध्येही सुरक्षित ठेवता येईल, तसेच डिजिटल फॉर्मेटमध्ये प्रिंटही करता येईल. निवडणूक आयोग दोन टप्प्यात ही सेवा सुरू करणार आहे. आजपासून अर्थात २५ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत केवळ नवीन मतदार, ज्यांनी वोटर आयडीसाठी अर्ज केलाय आणि ज्यांचे मोबाइल नंबर आयोगाकडे रजिस्टर्ड आहेत असे युजर डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करु शकतात.

तर, 1 फेब्रुवारीपासून सर्व मतदार ( ज्यांचा मोबाइल नंबर आयोगाकडे रजिस्टर्ड आहे ) आपल्या वोटर आयडीसाठी डिजिटल कॉपी डाउनलोड करु शकतात. ज्यांचा मोबाइल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेला नसेल त्यांना स्वतःबाबतचा सर्व तपशील पुन्हा पडताळावा लागेल आणि मोबाइल नंबर लिंक करावा लागेल. नंतरच वोटर आयडी डाउनलोड करता येईल.

डिजीटल वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी :- 
डिजीटल वोटर कार्ड डाउनलोड करण्यासाठी https://voterportal.eci.gov.in/ आणि https://nvsp.in/ हे दोन संकेतस्थळ आहेत. याशिवाय अँड्रॉइड मोबाइल युजर https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen
या लिंकवर आणि आयओएस युजर https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004 या लिंकवरही टॅप करु शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 12:50 pm

Web Title: e epic digital voter id card just like aadhaar and pan card now download your voter id online sas 89
Next Stories
1 लपून-छपून Porn बघणाऱ्यांचं आता काही खरं नाही…! प्रसिद्ध वेबसाइटचा डेटा गेला चोरीला
2 Poco च्या स्वस्त स्मार्टफोनची भारतात ‘डिमांड’, विक्रीचा आकडा 10 लाखांपार
3 Reliance Jio युजर्ससाठी ‘गुड न्यूज’, आता ‘या’ स्वस्त प्लॅनमध्ये मिळणार जास्त 4G डेटा
Just Now!
X