26 November 2020

News Flash

लांब आणि घनदाट केसांसाठी या गोष्टी आवर्जून करा

घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय

प्रातिनिधिक छायाचित्र

आपले केस लांब, काळेभोर आणि घनदाट असावेत असे जवळपास सर्वच मुलींना वाटते. मात्र सध्याचे प्रदूषण, चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती यांमुळे केस खराब होतात. मग ते चांगले होण्यासाठी कधी वेगवेगळी तेलं वापरली जातात तर कधी बाजारात मिळणारे शाम्पू आणि कंडिशनरचा वापर होतो. मात्र ही महागडी प्रसाधने वापरुनही म्हणावा तितका उपयोग होत नाही. मग केस चांगले होण्यासाठी नेमके काय करावे ते आपल्याला कळत नाही. पण स्त्रियांच्या सौंदर्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या केसांचा पोत सुधारण्यासाठी काही सोप्या गोष्टी निश्चितच उपयुक्त ठरतात. पाहूयात अशाच काही खास टिप्स…

१. कोरफड – कोरफडीमध्ये केसांसाठी उपयुक्त असे अनेक घटक असतात. त्यामुळे केसांची मुळे चांगली राहण्यास मदत होते. तसेच पेशींची अवस्था चांगली होण्यासही मदत होते. चांगल्या परिणामांसाठी कोरफडीची जेल आणि पाणी एकत्र करुन त्याचा स्प्रे केसांवर मारावा. मग गार पाण्याने केस धुवावेत. ही प्रक्रिया आठवड्यातून ३ ते ४ वेळा करावी. त्याचा चांगलाच फायदा होतो.

२. डोक्याला कोमट खोबरेल तेलाने मसाज करणे – डोक्यात कोमट खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्याचा केसांचा पोत सुधारण्यास चांगलीच मदत होते. किमान १५ मिनीटे मसाज करणे आवश्यक असते. त्यानंतर ३० मिनिटे तसेच राहू द्या. मग गरम पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने केस बांधून ठेवा. मग एखाद्या सौम्य शाम्पूने केस धुवा.

३. केस कायम गार पाण्याने धुवा – आपल्यातील अनेक जण गरम पाण्याने आंघोळ करतात. मग केस धुतानाही आपण तेच पाणी वापरतो. पण गरम पाणी केसांसाठी हानिकारक असते. तेच गार पाणी वापरल्यास केस जास्त सिल्की होतात. तसेच गार पाण्याने केसांमधील मॉईश्चर टिकून राहण्यास मदत होते.

४. कांद्याचा रस लावा – कांद्याच्या रसात सल्फर, व्हीटॅमिन सी, फोलिक अॅसिड असे घटक असतात. त्यामुळे रस्ताभिसरणक्रिया चांगली होण्यास तसेच केसांचे पोषण होण्यास मदत होते. तसेच यामध्ये असणारा बायोटीन हा घटक केस सिल्की करण्यास उपयुक्त ठरतो. त्यामुळे कांद्याचा रस केसांच्या मूळांशी लावून तो १० ते १५ मिनिटे ठेवावा. मग सौम्य शाम्पूने केस धुवावेत.

५. आरोग्यदायी खाणे आवश्यक – चांगले खाण्याच्या सवयी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्याचप्रमाणे केसांसाठीही खाण्याच्या पद्धती चांगल्या असणे आवश्यक असते. चांगले अन्न खाल्ल्यास डोक्यातील रक्ताभिसरणक्रिया चांगली होते. हिरव्या पालेभाज्या, फळे यांमुळे केसांना चांगले पोषण मिळते आणि केस सिल्की होतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2018 5:29 pm

Web Title: easy and important tips for silky and long hair
Next Stories
1 टाटा मोटर्सने आणल्या ग्राहकांसाठी विशेष मॉन्सून ऑफर्स
2 ट्रू कॉलर वरुनही करता येणार कॉल रेकॉर्डिंग
3 आता इअररिंग्जसारखेच कानात घालता येणार हेडफोन्स
Just Now!
X