News Flash

अॅसिडीटी झाल्यास ‘हे’ उपाय करुन पाहा

सहज करता येतील असे सोपे उपाय

अॅसिडीटी ही हल्ली अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. जेवणाच्या चुकीच्या वेळा, अपूरी झोप, जंक फूड, चहा आणि कॉफी यांचे व्यसन किंवा मसालेदार खाणे यांसारख्या गोष्टींमुळे अनेकांना कायम पित्ताचा त्रास होतो. हा त्रास होऊ नये यासाठी जीवनशैलीत काही महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक असते. पण सगळ्या गोष्टी पाळूनही अॅसिडीटी झालीच तर आपल्याला त्यावर करता येतील असे काही सोपे उपाय माहित असणे आवश्यक असते. अॅसिडीटीमुळए होणारी डोकेदुखी, जळजळ, उलट्या, अपचन यांसारखा त्रास होऊ नये म्हणून कोणते सोपे उपाय करता येतील पाहूया…

हल्लीच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना पित्ताचा त्रास वारंवार जाणवतो. झोप पूर्ण न होणे, तणावग्रस्त जीवनशैली, तसेच मोठ्या प्रमाणा फास्ट फूड खाल्ल्याने पित्तदोष निर्माण होतात. यावेळी छातीत जळजळ, उलट्या, अपचनाचा त्रास जाणवतो. पण आपण याकडे तितकेसे लक्ष देत नाही. वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते.

व्हॅनिला आईस्क्रीम – आईस्क्रीममध्ये असणारे घटक अॅसिडीटी कमी करण्यास उपयुक्त असतात. त्यामध्ये असणारा दुधाचा किंवा दुधाच्या पावडरचा अंश अॅसिडीटी कमी करण्यास उपयुक्त ठरतो. त्यामुळे पित्त झाल्याचे समजल्यास लगेचच व्हॅनिला आईस्क्रीम खाणे फायद्याचे ठरते.

तुळस आणि तुळशीचे बी – तुळशीमध्ये अँटी अल्सर घटक असतात. त्यामुळे पोटातील वाढलेली अॅसिडची पातळी कमी होण्यास तुळस अतिशय उत्तम उपाय आहे. तुळशीची पाने चावून खाल्ल्याने अॅसिडीटी कमी होण्यास मदत होते. याशिवाय हल्ली बाजारात तुळशीचे बी सहज उपलब्ध होते. त्याचाही अॅसिडीटी कमी होण्यास उपयोग होतो. तुळस अनेकदा घरात असल्याने ती खाणेही सोपे असते. त्यामुळे पित्ताचा त्रास जाणवत असेल तर ४-५ तुळशीची पाने खावीत किंवा ग्लासभर पाण्यात भिजवलेले तुळशीच्या बीचे पाणी प्यावे.

केळी – केळ्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम असते. या घटकांमुळे पोटातील अॅसिडची प्रक्रिया कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अॅसिडीटी झाल्यास केळे खाणे हा स्वस्तात मस्त उपाय आहे. केळ्यातील फायबरही पचनक्रीया सुलभ होण्यास उपयुक्त असते. केळ्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.

दूध – दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते. पित्ताचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करावे. यामुळे पोटातील जळजळ कमी होण्यास मदत होते. रात्री झोपताना गार दूध प्यायल्यास पित्ताची तक्रार कमी होते.

बडिशेप – बडिशेपही पित्तावर गुणकारी आहे. यात अँटी अल्सर घटक असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेवरही बडिशेप खाणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे पित्ताची शक्यता वाटत असल्यास त्या व्यक्तींनी बडिशेपचे दाणे चघळावेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 5:10 pm

Web Title: easy home remedies for acidity problem important tips
Next Stories
1 इटालियन कॉफी आणि बरंच काही…
2 खूशखबर! विमानातही चांगल्या स्पीडचे इंटरनेट देणार ‘ही’ कंपनी
3 सकाळी कोमट पाणी आणि हळद पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे
Just Now!
X