News Flash

पावसाळी चप्पल, बूट घेताना ‘या’ चार गोष्टी कायम लक्षात ठेवा

पावसाळ्यात चपलांमुळे पायाला दुखापत होण्याची शक्यता असल्याने...

प्रातिनिधिक फोटो

जून महिना आला की घरातील सर्वच वयोगटातील सदस्यांसाठी रेनकोट, छत्री यांबरोबरच चपला आणि बुटांचीही खरेदी करावी लागते. नेमेची येतो पावसाळा… या उक्तीप्रमाणे दरवर्षी येणाऱ्या पावसाळ्याबरोबरच या काही गोष्टींची खरेदीही दरवर्षी न चुकता करणारे अनेक जण आहेत.

हे पावसाळी चपला आणि बूट ट्रेंडी असावेत असे आपल्याला वाटत असते. बाजारातही विविध रंगांचे, वेगवेगळ्या प्रकारची पादत्राणे उपलब्ध असतात. मग पावसाळ्यातही आपण फॅशन अपडेट असावे याचा प्रयत्न प्रत्येक जणच करताना दिसतो. पावसाळी चपलांमध्ये रबरी, प्लॅस्टीक असे प्रकार उपलब्ध असतात. यात अगदी स्वस्तातील चपलांपासून अनेक ब्रॅंडही या विशेष पावसाळी चपला बाजारात आणतात.

पावसाळ्यात पाण्यातून आणि काही वेळा चिखलातून चालावे लागल्याने पाय तर खराब होतातच मात्र चपलांमुळे कपडेही खराब होतात. असे होऊ नये यासाठी जास्तीत जास्त चांगल्या चप्पलचा शोध आपल्यातील अनेकजण घेत असतात. मात्र अनेकदा चपलांच्या दिसण्याकडे लक्ष देत असताना त्यांच्या दर्जाबाबतही खात्री करुन घेणे तितकेच गरजेचे असते. आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा कायमच पायावर येत असतो. हा भार उत्तमपद्धतीने पेलण्यासाठी पायांत चांगली ताकद असणे गरजेचे असते. ही ताकद सुरुवातीला नसली तरीही ती कमावताही येऊ शकते.

अशावेळी चपलांचा रोल अतिशय महत्त्वाचा असतो. कोणत्याही ऋतूमध्ये चांगल्या प्रकारच्या चपला वापरणे केव्हाही उत्तम. मात्र पावसाळ्यात ही काळजी जास्त प्रमाणात घ्य़ावी लागते. सुरुवातीला आरामदायी वाटणाऱ्या या चपला कालांतराने त्रासाच्या ठरु शकतात. काहीवेळा पावसाळी रबरी चपलांमुळे पायाला दुखापत होण्याची शक्यता असते. मात्र अशी दुखापत होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी…

१. ज्यांना कमी चालावे लागते, त्यांच्यासाठी रबरी चपलांचा पर्याय ठिक आहे पण ज्यांना दररोज १० मिनीटांहून अधिक चालावे लागते त्यांच्यासाठी या चपला किंवा बूट उपयोगाचे नाहीत.

२. पावसाळ्यात पाण्यातून आणि काही वेळा चिखलातून चालावे लागते. त्यामुळे चपलेला ग्रीप असणे गरजेचे असते. मात्र केवळ अंगठा असलेली चप्पल असेल तर अशाप्रकारची ग्रीप मिळत नाही. त्यामुळे पावसाळी पादत्राणे खरेदी करताना ते पूर्ण बंद असतील याची काळजी घ्यायला हवा. त्यामुळे पाय अडकून बसण्याची भिती कमी राहते.

३. चालताना शरीराचा भार हा पायावर असतो. त्यामुळे चालताना पायांना सपोर्टची आवश्यकता असते. हा सपोर्ट न मिळाल्यास पावले, पायाचे घोटे, बोटे आणि टाचा दुखण्याची शक्यता असते. या चपलांमुळे अनेकदा पाय आणि गुडघ्यांची दुखापतही उद्भवू शकते.

४. रबरी चपला पकडण्यासाठी पायात ताकद लागते. ही ताकद लावल्याने पायांच्या स्नायूंवर ताण येतो. दिर्घकाळ या चपला पायात धराव्या लागल्या तर स्नायू कडक होतात आणि पाय दुखण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पावसाळी चपला घेताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 7:12 pm

Web Title: easy tips to choose the best footwear for monsoon scsg 91
Next Stories
1 पावसाळ्यात गर्भवती महिलांनी घ्या ‘ही’ विशेष काळजी
2 बहुगुणी आवळा! जाणून घ्या फायदे
3 कसा आहे सॅमसंगचा लेटेस्ट Galaxy A21s ?,’रेडमी नोट 9 प्रो’ला देणार टक्कर
Just Now!
X