हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याच्या त्रासाला हमखास सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून अनेकजण क्रीम, पेट्रोलियम जेली आणि जेल्सचा वापर करतात. मात्र, या कोरड्या त्वचेवर एक घरगुती उपचार उपलब्ध आहे तो म्हणजे दूध! काही विशिष्ट पदार्थांबरोबर दुधाचे मिश्रण करुन लावल्यास त्याचा त्वचेला बराच फायदा होतो. थंडीत चेहऱ्यावरचा तजेलदारपणा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडते. हाच तजेलदारपणा वाढणण्यासाठी दूधाचा कशाप्रकारे वापर करता येईल जाणून घेऊयात…

हिवाळ्यात अनेक लोकांना ड्राय स्किनची समस्या होते. त्वचेचा ग्लो कमी झाल्यामुळे असे होते. परंतु आपण चेह-यावर रोज विविध पदार्थांसोबत दूध अप्लाय केले तर त्वचेचा ग्लो दुप्पटीने वाढतो. ब्यूटी एक्सपर्ट कांता सूद दूधासोबत काही पदार्थ मिसळून लावण्याचा सल्ला देतात. यामुळे त्वचेचा ग्लो वाढवला जाऊ शकतो.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

दुधाची साय चेहऱ्यावरील लाल डाग घालवण्यासाठी फायद्याची असते. दुधाची साय डाग पडलेल्या जागी लावून ती सुकू द्यावी. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुतल्यास लाल डाग कमी करण्यास मदत होते तसेच साय लावलेला चेहऱ्यावरील भागाचा तजेलदारपणाही वाढतो.

वर्षभर उपलब्ध होणारे फळ म्हणजे केळं. चार चमचे दुधात अर्धे केळे कुस्करून तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावावे. अर्ध्या तासानंतर ते धुवून टाकावे. यामुळे चेहऱ्यावरील स्कीन पोअर्समधील (त्वचेवरील छिद्रे) धुलीकण आणि घाण निघून जाते. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि तजेलदार दिसतो.

दूध आणि गुलाबपाणी समप्रमाणात मिश्रण करुन त्याचा लेप चेहऱ्यावर अर्ध्या तासासाठी लावून ठेवल्यास चेहऱ्याला भरपूर प्राणात मॉइश्चरायझर मिळते आणि चेहऱ्याचा तजेलदारपणा वाढतो.

मध हे त्वचेसाठी उपयुक्त असते. समप्रमाणात मध आणि दुधाची साय एकत्र करुन तयार केलेले मिश्रण अर्धा तास चेहऱ्यावर लावून नंतर धुवून टाकावे. मधामुळे त्वचेचा कोरडेपणा तर कमी होतोच शिवाय त्वचा मुलायमही होते.

कोरड्या त्वचेला तजेलदारपणा आणण्यासाठी आणखीन एक सोपा उपाय म्हणजे हळद आणि दुधाच्या सायीचे मिश्रण चेहऱ्याला लावणे. एकास अर्धा (एक चमचा दुधाची साय अर्धा चमचा हळद) प्रमाणात मिश्रण करुन तयार केलेला लेप ३० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून नंतर थंड पाण्याने धुवून टाकावा. दिवसातून दोनवेळा म्हणजेच सकाळ-संध्याकाळ असे केल्याने चेहऱ्यावर तजेलदारपणा येण्याबरोबरच स्कीन टोनही सुधारतो.

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी थोडा खर्चिक पण घरगुती उपाय म्हणजे दूधात भिजवलेल्या काजूंचा लेप चेहऱ्यावर लावणे. ३० मिनिटांसाठी हा लेप लावला तर चेहऱ्याचा तेलदारपणा वाढण्याबरोबरच सुरकुत्याही कमी होतात.

लिंबामधील आम्लामुळे डाग दूर होण्यास मदत होते. चार चमचे दुधात एक चमचा लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावल्यास त्वचेला तजेलदारपणा तर येतो. तसेच चेहऱ्यावरील डागही कमी होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील पिंपल्स आणि इतर कारणांमुळे पडलेले डागही कमी होतात.