News Flash

दातांची चमक वाढविण्यासाठी ‘हे’ उपाय करा

काही गोष्टी पाळणे गरजेचे

female smile

तुम्हाला सुंदर हास्य हवे असेल तर त्यासाठी तुमचे दात स्वच्छ असणे गरजेचे आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, खाल्ल्यानंतर दात स्वच्छ न घासणे यांमुळे दात किडणे, दात दुखणे, दात कमकुवत होऊन पडणे अशा समस्या निर्माण होतात. दातांची निगा राखणे हे दातांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. पण दातांची स्वच्छता ठेवली नाही तर तुमचे संपूर्ण आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे दातांचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास काही सोप्या टीप्सचा अवलंब करणे आवश्यक आहे. आता या टीप्स नेमक्या काय आहेत ज्यामुळे दाताचे आरोग्य चांगले राहील पाहूया….

दात पूर्ण २ मिनिटे घासा

दात स्वच्छ ठेवण्यासाठी ते घासणे अतिशय़ महत्त्वाचे असते. यातही दात भरभर घासल्यास ते नीट स्वच्छ होत नाहीत. त्यामुळे दातात अडकलेले अन्नाचे कण निघण्यास मदत होते. याबरोबरच ब्रश संपूर्ण तोंडात योग्य पद्धतीने फिरवून दात स्वच्छ करावेत.

झोपण्यापूर्वी दात घासा

दिवसातून दोनदा दात घासणे दातांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. यातही रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे आवश्यक आहे. त्यामुळे दिवसभर तोंडात जमा झालेले जीवाणू आणि किटाणू निघून जाण्यास मदत होते.

भरपूर पाणी प्या

चांगल्या आरोग्यासाठी शरीरात दररोज पुरेसे पाणी जाणे आवश्यक असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. मात्र त्याबरोबरच तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठीही भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. जास्त पाणी प्यायल्याने तोंडात अडकलेले अन्नाचे कण निघून जाण्यास मदत होते. हे कण पाण्याबरोबर वाहून पोटात जातात.

साखर आणि आम्लयुक्त पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा

जास्त साखर आणि आम्लयुक्त पदार्थ खाण्याने दाताचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे हे पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवणे दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

तंबाखू खाणे टाळा

तंबाखूमध्ये आरोग्याला अपायकारक घटक असतातच, पण दातांच्या आरोग्यासाठीही तंबाखू खाणे धोकादायक असते. त्यामुळे दाताचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तंबाखू खाणे टाळावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 6:06 pm

Web Title: easy tips to keep teeth clean and healthy
Next Stories
1 फ्लिपकार्टवर अॅपलच्या मोबाईलसाठी ‘या’ खास ऑफर्स
2 गुंतता संचय हा…
3 होळी स्पेशल : ‘हे’ आहेत पाण्यातही ओले न होणारे फोन
Just Now!
X