साधारणपणे कोणत्याही प्रकारचे चॉकलेट खाल्ल्याने चरबी वाढते किंवा अन्य परिणाम आपल्या शरीरावर होतातच. परंतु ज्या महिलांची मासिक पाळी बंद झाली आहे त्यांनी चॉकलेट खाण्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊ शकते. एका अभ्यासानुसार हे लक्षात आले आहे. दिवसातील ठरविक वेळी त्यांनी चॉकलेट खाल्ल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच रक्तातील साखरेची पातळी योग्य राहण्यासाठीही मदत होऊ शकते.

कसा केला हा अभ्यास?

हा अभ्यास द एफएएसईबी जर्नलमध्ये प्रकाशित झाला होता. ब्रिघॅमच्या संशोधकांनी स्पेनच्या मर्सिया विद्यापीठासह दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी मिल्क चॉकलेट खाण्यामुळे होण्याऱ्या दुष्परिणामांबद्दल अभ्यास केला. एकत्रितपणे, त्यांनी १९ पोस्टमेनोपॉसल महिलांची म्हणजे मासिक पाळी बंद झालेल्या महिलांची यादृच्छिक (randomized), नियंत्रित आणि क्रॉस-ओव्हर चाचणी केली. ज्यांनी सकाळी उठल्यापासून १ तासाच्या आत १०० ग्रॅम चॉकलेट खाल्ले किंवा रात्री झोपण्याच्या १ तास आधी १०० ग्रॅम चॉकलेट खाल्ले अशा महिलांमध्ये वजन वाढले का? किंवा चॉकलेट खाण्यामुळे अन्य काही बदल झाले का? हे तपासण्यात आले.

 अभ्यासात काय समजलं?

१. सकाळी किंवा रात्रीच्या वेळी चॉकलेटचे सेवन केल्याने वजन वाढले नाही.

२. सकाळी किंवा संध्याकाळी चॉकलेट खाल्ल्याचा परिणाम भुकेवर, झोपेवर आणि इतर गोष्टींवरही होऊ शकतो.

३. सकाळच्या वेळी चॉकलेटचे जास्त सेवन केल्याने चरबी कमी होण्यास आणि रक्तातील ग्लुकोजची (साखरेची) पातळी कमी होण्यास मदत होते.

फ्रँक एजेएल स्कीअर, पीएचडी, एमएससी, न्यूरो सायंटिस्ट आणि मार्टा गरॅलेट, पीएचडी, व्हिजिटिंग सायंटिस्ट, स्लीप अँड सर्किडियन डिसऑर्डर विभाग, मेडिसीन आणि न्यूरोलॉजी विभाग, ब्रिघॅम आणि महिला रुग्णालय, डीआरएस स्कीअर आणि गाराउलेट यांनी संयुक्तपणे हा अभ्यास केला आहे. “आमचे निष्कर्ष चॉकलेट खाल्ल्यामुळे काय होते एवढेच सांगत नाहीत तर कोणत्या वेळी चॉकलेट खाण्यामुळे फायदा होतो तेही सांगतात”, असं फ्रँक एजेएल स्कीअर म्हणतात. तर गॅरोलेट म्हणतात की, “आम्ही अभ्यास केलेल्या महिला स्वयंसेवकांचे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढल्यानंतरही वजन वाढले नाही. आमचा निकाल दर्शवितो की, गोड खाण्यामुळे भुकेवर परिणाम होतो.”