03 December 2020

News Flash

सतत गोड खाण्याने मेंदू सुस्तावतो

केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणे कमी करा.

| September 7, 2013 01:59 am

केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणे कमी करा. कारण, या पदार्थांमुळे आपल्या बौद्धिक क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. केक, कुकी, जेली, जॅम आणि शीत पेये यांसारख्या पदार्थांचे अतिसेवन केल्यास जेमतेम सहा आठवड्यांत वेडसर दिसायला होते. यावर संशोधन करणाऱ्या गोमेज पिनाला म्हणाले, “आपण जे खातो, तसेच आपले विचार बनत असल्याचे या परीक्षणाअंती समोर आले आहे.” ‘लाईव्ह सायन्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार सतत गोड खाल्ल्याने मेंदू सुस्तावतो आणि स्मरणशक्ती कमी होत जाते. यावर उपाय म्हणजे ओमेगा-३ फॅटी ऍसिड असणारे अन्न जेवल्याने हा धोका कमी होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:59 am

Web Title: eating to much sweet harm to brain power
टॅग Brain,Lifestyle News
Next Stories
1 झोपेत घोरण्याने कर्करोगाला आमंत्रण
2 उच्च रक्तदाबावर नवी उपचारपध्दत
3 एसएमएस, चॅटिंग आणि डिजिटल युगातील खोटारडेपणा!
Just Now!
X