गेल्या वर्षी पश्चिम आफ्रिकेत अकरा हजार बळी घेणारा इबोलाचा विषाणू परत येण्याची शक्यता आहे, असा धोक्याचा इशारा काँगोचे इबोलातज्ज्ञ जीन जॅकस म्युएम्बी यांनी दिला आहे. १९७६ मध्ये मध्य आफ्रिकेत इबोलाची पहिली साथ आली तेव्हापासून म्युएम्बी हे इबोलात जगातील एक सर्वोच्च संशोधक मानले जातात.
पश्चिम आफ्रिकेत इबोलाने ११ हजार बळी घेतले होते ती साथ ओसरली, पण आता पुन्हा हा जीवघेणा विषाणू जगाला धोका उत्पन्न करणार आहे. म्युएम्बी यांनी किनाशासा येथे वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला असून, बेल्जियममधील लुवेन विद्यापीठात त्यांचे उच्चशिक्षण झाले आहे. त्यानंतर ते काँगोत परत आले.  झैरेमध्ये १९७६ मध्ये इबोलाचा पहिल्यांदा प्रसार झाला तेव्हा याम्बुकू खेडय़ात रोगाची लागण झाली होती. त्या वेळी अनेक मरत आहेत, त्याबाबत संशोधन करा असे तेव्हा आरोग्य मंत्रालयाने आपल्याला सांगितले होते असे म्युएम्बी म्हणाले. सुरुवातीला मुएम्बी यांना इबोलाचा ताप म्हणजे विषमज्वर वाटला होता  पण त्यांनी संशोधन करून त्याचे कारण शोधले. त्या वेळी एका बेल्जियन परिचारिकेला ताप आला होता तिच्यासह ते याम्बुकूतून किनाशासाला परत आले. तिच्या रक्ताचे नमुने घेतले व अँटवर्प येथील इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन येथे शीतपेटीत ठेवले. त्यामुळे नंतर वैज्ञानिक पीटल पायट यांना कृमीसारखा इबोला विषाणू शोधता आला. इबोला नदीवरून त्याचे नाव इबोला ठेवण्यात आले. नंतर इबोलाबाबत १९९५ पर्यंत शांतता होती त्या वेळी म्युएम्बी यांना दक्षिण काँगोत टिकविट येथे बोलावण्यात आले. तेथे रक्तासह डायरियाची साथ चालू होती. लोक पटापट मरत होते. म्युएम्बी यांनी सांगितले, की त्या वेळी आपण इटालियन परिचारिकेची तपासणी केली व याम्बुकू येथील घटना आठवली. त्यानंतर रुग्णांच्या रक्तातून या परिचारिकेला रोग झाल्याचे दिसून आले. शरीरातील द्रावातून हा रोग पसरत असल्याचे तेव्हा दिसून आले.
तेव्हापासून रुग्णांना वेगळे ठेवण्यास सुरुवात करण्यात आली व तेच धोरण आज जागतिक आरोग्य संघटना राबवत आहे. प्रा. म्युएम्बी व त्यांच्या पथकाने नंतर रुग्णांच्या शरीरातील द्राव तपासले. त्यांनी सांगितले, की आम्ही इबोलाग्रस्त रुग्णांचे रक्त घेतले व ते आठ आजारी रुग्णांमध्ये टोचले. त्यातील सात वाचले पण प्रत्यक्षात या रोगात अजूनही मृत्युदर ८० टक्के आहे. त्यावरची उपचारपद्धती तयार करण्यात येत आहे.
रक्ताचा नमुना देऊन औषध शोधण्यात मदत
इबोला रुग्णावर उपचार करणाऱ्या परिचारिका अँबेर विन्सन यांना गेल्या वर्षी इबोलाची लागण झाली. त्यातून त्या बऱ्या झाल्या पण त्यांनी त्यांच्या रक्ताचा नमुना एक्सबायोटेक या कंपनीला दिला. त्यानंतर इबोला विषाणूला मारणारे प्रतिपिंड तयार करण्यात यश आले असून, इबोलावरचे औषध तयार करण्यात यश आले आहे. विन्सन यांनी रक्ताचा नमुना देऊन या रोगावर औषध शोधून काढण्यात मोठी मदत केली आहे.

Shash Mahapurush Rajyog
३० वर्षांनी ‘शश राजयोग’ बनल्याने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा
challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच