इन्स्टाग्रामबाबत कंपनीनं एक मोठा निर्णय घेतला आहे. थर्ड पार्टी वेबसाईट किंवा प्लॅटफॉर्मवर अन्य इन्स्टाग्राम युझर्सचे फोटो एम्बेड करण्यापूर्वी आता संबंधितांची परवानगी घ्यावी लागणार आहे. याचा अर्थ एखादी व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची पोस्ट आपल्या वेबसाईटवर एम्बेड करायची असेल तक त्याला कॉपिराइट लायसन्ससाठी विचारणा करावी लागणार आहे.

जर एखादी पोस्ट त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय एम्बेड केली तर ती कॉपिराईट कायद्या अंतर्गत येणार आहे. आर्स टेक्निकाच्या अहवालात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार फेसबुकची मालकी असलेले इन्स्टाग्रा युझर्सला अन्य वेबसाईटवर एम्बेड इमेजेसला डिस्प्ले करण्यासाठी कॉपिराईट लायसन्स प्रदान करणार नाही. “आमच्या अटी आम्हाला कॉपिराईट लायसन्स प्रदान करण्याची परवानगी देते. परंतु एम्बेड एपीआयसाठी मात्र ग्रांट मिळत नाही,” असं फेसबुकच्या प्रवक्त्यानं सांगितल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

“आमच्या धोरणांमध्ये लागू केलेल्या हक्कांना धारकांकडून आवश्यक अधिकार मिळविण्यासाठी तिसऱ्या पक्षाची आवश्यकता असते. यात समजा कायदेशीर लायसन्सची आवश्यकता आहे, तर त्यांच्याकडे काँटेंट घेण्यासाठी लायसन्स असणं आवश्यकच आहे,” असंही त्यांनी नमूद केल्याचं अहवालात म्हटलं आहे. तसंच एम्बेडवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक मार्गांचा विचार सुरू असल्याचंही फेसबुकनं आर्स टेक्निकाला सांगितल्याचं अहवालात म्हटलं आहे. सद्यस्थितीत फोटोग्राफर केवळ फोटोंना खाजगी बनवून एम्बेड करण्याला प्रतिबंध लावू शकतात, असंही सांगण्यात आलं आहे.