News Flash

कामाच्या ठिकाणी एकत्र जेवल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते

सांघिक कामगिरी सुधारण्यासाठी एकमेकांमध्ये योग्य ताळमेळ असणे आवश्यक असते.

आधिक अभ्यासासाठी केव्हिन क्निफीन यांनी १५ महिने संशोधन केले.

कामाच्या ठिकाणी जर आपण एकट्याने जेवण घेत असाल तर ही सवय आपल्याला बदलण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत जेवण घेतल्यास कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होत असल्याचे कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

सांघिक कामगिरी सुधारण्यासाठी एकमेकांमध्ये योग्य ताळमेळ असणे आवश्यक असते. एकत्र जेवण घेतल्याने हा ताळमेळ वाढण्यास मदत होते. याचा सकारात्मक परिणाम आपल्या कामावरदेखील होतो. जेवणाच्या ठिकाणी एकमेकांसोबत हसत-खेळत संवाद साधल्याने कामाचा ताण कमी होतो.

या विषयावरील आधिक अभ्यासासाठी केव्हिन क्निफीन यांनी १५ महिने संशोधन केले. दरम्यान त्यांनी अग्निशामक दलाच्या ५० शाखांमधील कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणादरम्यान अग्निशामक दलाच्या ३९५ निरिक्षकांच्या मुलाखती घेऊन निरिक्षण नोंदविण्यात आले. आठवड्यातून चार दिवस कामगार एकत्र जेवतात त्या दिवसांमध्ये त्याच्या कामाची क्षमता जास्त असते. जेव्हा ते एकत्र जेवत नाहीत, तेव्हा त्यांच्या कामाचा दर्जा खालावल्याचे या पाहाणीतून समोर आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 6:17 pm

Web Title: employees who eat together are more productive study
Next Stories
1 सुख म्हणजे नक्की काय?
2 मधुमेही, रक्तदाबाच्या रुग्णांना स्वाइन फ्लूची लस मोफत
3 साखरविरहित पेय दातांसाठी त्रासदायक
Just Now!
X