News Flash

चहा सोबत नाश्त्यासाठी बनवा चणा डाळीची ‘ही’ रेसिपी!

प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर रोजचं त्यांच्या सोशल मिडिया वरून रेसिपीचे फोटो आणि व्हिडिओ टाकत असतात. त्यांनी नुकतीच चहा सोबत पटकन तयार होणारी चमचमीत चणा

channa dal namkeen
कमी वेळात तयार होणारी चणा डाळीची रेसिपी नक्की ट्राय करा

आपल्याला चहाप्रेमी तर कुठेही भेटतील. यातील काही चहा प्रेमींना चहासोबत काही ना काही स्नॅक्स खाण्यासाठी हवाच असतो. चहा सोबत अनेकदा चमचमीत पदार्थ खाल्ले जातात. बिस्कीट, टोस्ट, खारी सारख्या रेडीमेड पदार्थांसोबतच चहाच्या वेळी चहाप्रमाणेच पटकन होणाऱ्या रेसिपींंचा शोध नेहमीच घेतला जातो. फरसाण, मसाला मुरमुरा, मसाला शेंगदाणे, भजी अशा डिश हमखास सगळ्यांना आवडतात. अशीच एक चमचमीत चणा डाळीची रेसिपी प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केली आहे. ही रेसिपी बनवायलाही अतिशय सोप्पी आहे!

रेसिपीसाठी साहित्य:

चणा डाळ – २ वाटी

बेकिंग सोडा – २ टीस्पून

पाणी – आवश्यकतेनुसार

तेल – तळण्यापुरते

१ किचन डस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kapur (@chefkunal)

मसाला बनवण्यासाठी साहित्य:

हिंग – ३/४ टीस्पून

मीठ – ३/४ टीस्पून

काळे मीठ – ३/४ टीस्पून

आमचूर – १ टेबलस्पून

पुदीनाची पाने – १ टेबलस्पून

मिरची पूड -१  टीस्पून

कृती:

  • पाण्यामध्ये डाळ व्यवस्थित साफ करून घ्या आणि किचन डस्टरवर पसरवून सुकवून घ्या.
  • एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चणा डाळ तळा.
  • तळून झाल्यावर जास्तीचे तेल काढून टाका आणि डाळ बाजूला ठेवा.
  • हिंग, मीठ, काळे मीठ, आमचूर, पुदीना पाने आणि मिरची पूड एका भांड्यात मिक्स करावे.
  • या मिश्रणात तळलेली चणा डाळ घालून मिक्स करावे.
  • व्यवस्थित मिक्स केलेली डाळ सर्व्ह करा.

चणा डाळीचे फायदे –

चणा डाळ शरीराला उर्जेचा  पुरवठा करते. तसेच हृदयासाठी अत्यंत उपयुक्त असते आणि  स्नायू बळकट करण्यासाठीही फायदेशीर ठरते. या खेरीज शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही चणा डाळीचा उपयोग होतो. दातांसाठी आणि हाडांसाठीही ही डाळ उपयुक्त आहे. रक्तदाब कमी करण्यासही डाळ मदत करते.

चणा डाळीचे तोटे-

चणा डाळ किंवा पूर्ण हरभरा खाण्याचे काही तोटेही आहेत. जास्त प्रमाणात चणा डाळ खाल्ल्यास अपचन, गॅसेस आणि पोटफुगी असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे थोड्या प्रमाणात सेवन केल्यास चना डाळीचा शरीरासाठी फायदा होऊ शकतो. ज्यांना मुतखड्याचा त्रास आहे त्यांनी शक्यतो हरभरे खाणे टाळावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2021 11:30 am

Web Title: enjoy tangy channa dal namkeen recipe tea time snack ttg 97
Next Stories
1 आता नखांवरही बसवली जाणार मायक्रोचिप; दुबईतील सलूनचा भन्नाट प्रयोग!
2 नेटफ्लिक्सच्या ‘माय लिस्ट’ या नव्या फिचरमध्ये तुम्हाला काय नवीन मिळणार आहे? जाणून घ्या!
3 आठवड्याभरात वजन कमी करायचंय?, या ‘सहा’ गोष्टींचं करा पालन
Just Now!
X